Leather and footwear stock: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थसंकल्प सादर केला. याअंतर्गत फुटविअर आणि लेदर क्षेत्रासाठी योजना सुरू करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर फुटविअर आणि लेदरशी संबंधित स्टॉक्समध्ये जोरदार तेजी दिसून आली.
कोणत्या शेअरची काय स्थिती?
बीएसईवर रिलॅक्सो फुटवेअरचा शेअर जवळपास ९ टक्क्यांनी वधारून ५९८.५० रुपयांवर पोहोचला. याशिवाय लिबर्टी शूजचा भाव ७.४ टक्क्यांनी वधारून ३९५ रुपयांवर पोहोचला. कॅम्पस अॅक्टिव्हवेअरचे शेअर्स ६.१२ टक्के (२८९.३ रुपये), बाटा इंडियाचे शेअर्स २.८ टक्के (१,२८८.४९ रुपये) आणि मेट्रो ब्रँड्सचे शेअर्स २.६ टक्क्यांनी (१,२१६.९ रुपये) वधारले.
मिर्झा इंटरनॅशनलचा शेअर १६ टक्क्यांनी वधारून ३६.९८ रुपयांवर पोहोचला. हरियाणा लेदर केमिकल्सचे शेअर्स १४.७ टक्के (८४.७९ रुपये), सुपर टॅनरीचे १४.१२ टक्के (११.९ रुपये) आणि एकेआय इंडियाचे शेअर्स ५ टक्क्यांनी वधारले.
अर्थसंकल्पातील घोषणा काय?
देशातील फुटविअर आणि लेदर क्षेत्राची उत्पादकता, गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी, २२ लाख लोकांना रोजगार देण्यासाठी, ४ लाख कोटी रुपयांची उलाढाल करण्यासाठी आणि १.१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्यात सुलभ करण्यासाठी अर्थसंकल्पात फोकस प्रॉडक्ट योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)