Multibagger Stock: टीव्हीएस मोटर कंपनीचे (TVS Motor Company) शेअर्स बुधवारी BSE वर वधारून ३५६४.५० रुपयांवर पोहोचले. दरम्यान, कंपनीनं मंगळवारी आपल्या भागधारकांसाठी १२०० टक्के अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. दुचाकी आणि तीनचाकी वाहनं बनवणाऱ्या या कंपनीने अवघ्या १० वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. टीव्हीएस मोटरच्या शेअर्सनी १० वर्षांत १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे ५४ लाख रुपयांहून अधिक केलेत. यापूर्वी २०१० मध्ये कंपनीने आपल्या भागधारकांना 'बोनस शेअर्स'ची भेटही दिली होती.
१ लाख रुपयांचे ५४ लाखांहून अधिक कसे झाले?
१ एप्रिल २०१६ रोजी टीव्हीएस मोटर कंपनीच्या शेअरची किंमत ६४.९७ रुपये होती. जर एखाद्या व्यक्तीनं त्यावेळी १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला कंपनीचे १,५३५ शेअर्स मिळाले असते. २५ मार्च २०२६ रोजी कंपनीचा शेअर ३५६४.५० रुपयांवर पोहोचला. सध्याच्या बाजारभावानुसार, या १५३५ शेअर्सचं मूल्य ५४.७१ लाख रुपये झालं असतं. ३१ मार्च २०२६ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने प्रति शेअर १२०० टक्के म्हणजेच प्रत्येक शेअरवर १२ रुपये अंतरिम लाभांश घोषित केला आहे. या लाभांशासाठी ३१ मार्च २०२६ ही 'रेकॉर्ड डेट' असेल.
उद्या श्री रामनवमीच्या दिवशी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की बंद? जाणून घ्या
५ वर्षांत शेअर्समध्ये ३००० टक्क्यांहून अधिक वाढ
गेल्या ५ वर्षांत टीव्हीएस मोटरच्या शेअर्सनी तुफानी तेजी नोंदवली आहे. ५ वर्षांत या शेअर्समध्ये ३००० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २६ मार्च २०२१ रोजी कंपनीचा शेअर ११४.१८ रुपयांवर होता, जो २५ मार्च २०२६ रोजी ३५६४.५० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ४ वर्षांत शेअर्समध्ये २८३० टक्के, तर गेल्या ३ वर्षांत १६०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
तसंच, गेल्या २ वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये ७६५ टक्के आणि गेल्या एका वर्षात ६३६ टक्के वाढ दिसून आली आहे. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ३९७० रुपये आहे, तर नीचांकी पातळी २२२१.०५ रुपये आहे. डिसेंबर २०२५ च्या तिमाहीनुसार, कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ५०.२७ टक्के असून सार्वजनिक शेअरहोल्डिंग ४९.७१ टक्के आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : TVS Motor shares surged, delivering massive returns to investors. A ₹1 lakh investment in TVS Motor ten years ago is now worth over ₹54 lakhs. The company also announced a 1200% interim dividend.
Web Summary : टीवीएस मोटर के शेयरों में उछाल, निवेशकों को भारी रिटर्न मिला। दस साल पहले टीवीएस मोटर में ₹1 लाख का निवेश अब ₹54 लाख से ज़्यादा का है। कंपनी ने 1200% अंतरिम लाभांश की भी घोषणा की।