Multibagger Stock: : गेल्या काही वर्षांत काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. टीआयएल लिमिटेड ही देखील त्यापैकीच एक कंपनी आहे. या शेअरची किंमत २ वर्षात ११४१ टक्क्यांनी वाढलीये. कंपनीच्या शेअर्सची किंमत २ वर्षापूर्वी २९.३० रुपयांच्या पातळीवर होती. आता हा शेअर ३६३.९० रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. मे महिनाही या कंपनीसाठी चांगला गेलाय.
आज म्हणजेच मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं. कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
कंपनी काय करते?
टीआयएल लिमिटेड ही मटेरिअल हँडलिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आहे. ही आपल्या क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी आहे. कंपनी संरक्षण क्षेत्रात विस्तार करत आहे. ही कंपनी क्रिटिकल मिलिट्री सिस्टमचं प्रोडक्शन तयार करणार आहे. कंपनीनं टीआयएल डिफेन्स नावाचं नवं युनिट तयार केलंय.
कंपनीची जबरदस्त कामगिरी
टीआयएल लिमिटेडचे शेअर्स मे महिन्यात ७१ टक्क्यांनी वधारलेत. या मल्टीबॅगर शेअरच्या किंमतीत जुलै २०२३ नंतर कोणत्याही महिन्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. जुलै २०२३ मध्ये टीआयएल लिमिटेडच्या शेअर्समध्ये १४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये या शेअरने ४३५ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. १७ मार्च २०२५ रोजी कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १६७ रुपये होता.
(टीप : यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)