Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:31 IST

Tata Titan Stock Price: टाटा समूहाच्या या कंपनीनं दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणाऱ्या भागधारकांना छप्परफाड परतावा दिला आहे. या शेअरनं १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य १ कोटी रुपयांहून अधिक केलंय.

Tata Titan Stock Price: टाटा समूहाची कंपनी 'टायटन'नं दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणाऱ्या भागधारकांना छप्परफाड परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी २० वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्सवर विश्वास दाखवला आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली, त्यांना टायटन कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. टायटननं २० वर्षांत १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य १ कोटी रुपयांहून अधिक केलंय. गेल्या २० वर्षांत टायटनच्या शेअर्समध्ये ११,००० टक्क्यांहून अधिक वादळी तेजी आली आहे.

१ लाख रुपयांचे झाले १.१७ कोटी रुपये

टाटा ग्रुपच्या टायटन कंपनीचे शेअर्स १३ जानेवारी २००६ रोजी ३५.७० रुपयांवर होते. कंपनीचे शेअर्स ९ जानेवारी २०२६ रोजी BSE मध्ये ४२०३ रुपयांवर बंद झाले आहेत. गेल्या २० वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये ११,६७७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीने १३ जानेवारी २००६ रोजी टायटनच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि आतापर्यंत ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर त्या शेअर्सचे विद्यमान मूल्य १.१७ कोटी रुपये झालं असतं. या गणनेत टायटनकडून देण्यात आलेले बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट आणि डिविडेंड यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या

१० वर्षांत ११५२% वाढले टायटनचे शेअर्स

टायटनचे शेअर्स गेल्या १० वर्षांत ११५२ टक्क्यांनी वधारले आहेत. टाटा समूहाच्या या दिग्गज कंपनीचे शेअर्स १५ जानेवारी २०१६ रोजी ३३५.८५ रुपयांवर होते. टायटनचे शेअर्स ९ जानेवारी २०२६ रोजी ४२०३ रुपयांवर बंद झाले. गेल्या पाच वर्षांत टायटनच्या शेअर्समध्ये १७१ टक्क्यांहून अधिक उसळी आली आहे. गेल्या एका वर्षात टायटनचे शेअर्स सुमारे २१ टक्क्यांनी वाढले आहेत, तर गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये २२ टक्क्यांहून अधिक तेजी आली आहे. टायटनच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ४३१२ रुपये आहे, तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २,९४७.५५ रुपये आहे.

कंपनीनं वाटलेत बोनस शेअर्स

टाटा समूहाची कंपनी टायटननं आपल्या भागधारकांना यापूर्वी बोनस शेअर्सची भेट दिली आहे. तसंच, आपल्या शेअर्सचं विभाजनदेखील केले आहे. टायटननं जून २०११ मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते; म्हणजेच कंपनीने प्रत्येक शेअरवर १ बोनस शेअर वाटला होता. टायटनन जून २०११ मध्येच आपल्या शेअरचं विभाजनही केलं होतं. कंपनीनं १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या आपल्या एका शेअरचे १-१ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या १० शेअर्समध्ये विभाजन केलं होतं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Tata's Titan Made Investors Rich: ₹1 Lakh to ₹1 Crore+

Web Summary : Tata's Titan has delivered massive returns, turning a ₹1 lakh investment made 20 years ago into over ₹1 crore. The stock has surged over 11,000% in two decades, rewarding long-term shareholders with bonus shares and stock splits.
टॅग्स :टाटाशेअर बाजारगुंतवणूकपैसा