Join us

Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 15:40 IST

Stock Market Updates: गेल्या वर्षभरात त्यांच्या पोर्टफोलिओमधील चार कंपन्यांनी ५०% ते १५५% पर्यंत प्रभावी परतावा दिला आहे. गोल्डमन सॅक्सचा भारतीय पोर्टफोलिओ १०,००० कोटींपेक्षा जास्त आहे आणि ५० हून अधिक कंपन्यांमध्ये पसरलेला आहे.

Stock Market Updates: भारतीय शेअर बाजारात घसरण असूनही, जागतिक गुंतवणूक दिग्गज गोल्डमन सॅक्सनं त्यांच्या भारतीय गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवला आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या पोर्टफोलिओमधील चार कंपन्यांनी ५०% ते १५५% पर्यंत प्रभावी परतावा दिला आहे. गोल्डमन सॅक्सचा भारतीय पोर्टफोलिओ १०,००० कोटींपेक्षा जास्त आहे आणि ५० हून अधिक कंपन्यांमध्ये पसरलेला आहे.

पोर्टफोलिओ स्टार परफॉर्मर्स

गेल्या वर्षभरात कामगिरी करणाऱ्या चार टॉप कंपन्या कोणत्या?

१. कारट्रेड टेक: हे ऑनलाइन ऑटो मार्केटप्लेस गोल्डमन सॅक्सच्या पोर्टफोलिओमधील सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे. गोल्डमन सॅक्सचा कंपनीत २.१९% हिस्सा आहे आणि गेल्या वर्षभरात त्यांच्या स्टॉकमध्ये १५५.३५% ची जोरदार वाढ झाली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका

२. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स: या ट्रान्सफॉर्मर उत्पादक कंपनीत गोल्डमन सॅक्सचा अंदाजे २% हिस्सा आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या स्टॉकमध्ये ५९.७५% वाढ झाली.

३. एसजेएस एंटरप्रायझेस: या ऑटो कंपोनंट उत्पादक कंपनीत गोल्डमन सॅक्सचा ४.८% हिस्सा आहे. गेल्या १२ महिन्यांत त्यांच्या स्टॉकमध्ये ५७.७८% वाढ झाली आहे.

४. पर्ल ग्लोबल: या कापड आणि वस्त्रोद्योग कंपनीत गोल्डमन सॅक्सचा २.७६% हिस्सा आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ५३.३३% परतावा दिला आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या ५०% करामुळे २०२५ मध्ये त्यात १५% घसरण झाली आहे.

बाजाराला मागे टाकत कामगिरी

ET नुसार, गोल्डमन सॅक्सच्या निवडक स्टॉकची ही मजबूत कामगिरी अशा वेळी झाली आहे जेव्हा भारतातील प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये गेल्या वर्षभरात सुमारे ४% घसरण झाली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) देखील भारतीय स्टॉकची विक्री करत आहेत, कारण भारतीय बाजार इतर उद्योन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत महाग आहे. या अशा वातावरणात, गोल्डमन सॅक्सच्या स्टॉक्सनं सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुतंवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Goldman Sachs' stocks shine, yielding up to 155% in one year.

Web Summary : Despite market dips, Goldman Sachs' Indian investments soared. Four stocks, including CarTrade Tech, Transformers, SJS, and Pearl Global, delivered returns from 50% to 155% in a year, outperforming major indices.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा