Join us

टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:11 IST

Tata Capital IPO : येत्या काळात टाटा ग्रुपचा आणखी एक आयपीओ भारतीय शेअर बाजारात येणार आहे. या कंपनीने सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत.

Tata Capital IPO : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापारी धोरणामुळे भारतीय शेअर बाजार प्रचंड अस्थिर आहेत. परिणामी कोट्यवधी गुंतवणूकदार चिंतेत आहेत. पण, अशा परिस्थितीत एक दिलासा आणि गुंतवणुकीची संधी देणारी बातमी समोर आली आहे. लवकरच एक मोठा आयपीओ बाजारात खळबळ उडवण्याची शक्यता आहे. टाटा ग्रुपची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी टाटा कॅपिटल लवकरच आपला आयपीओ घेऊन येत आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

आयपीओबद्दल महत्त्वाची माहिती

  • शेअर्सची संख्या: टाटा कॅपिटलच्या या आयपीओमध्ये एकूण ४७.५८ कोटी शेअर्स ऑफर केले जातील.
  • नवीन आणि जुने शेअर्स: यापैकी २१ कोटी नवीन शेअर्स असतील आणि २६.५८ कोटी शेअर्स 'ऑफर फॉर सेल'द्वारे विकले जातील. 'ऑफर फॉर सेल' मध्ये टाटा सन्स आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आपले काही शेअर्स विकणार आहेत.
  • आयपीओचा संभाव्य आकार: सूत्रांनुसार, या आयपीओचा आकार जवळपास १६,८०० कोटी रुपये असू शकतो, ज्यामुळे कंपनीचे मूल्यांकन ९२,४०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

या पैशांचा वापर कुठे होणार?आयपीओद्वारे मिळणाऱ्या पैशांचा वापर कंपनी आपल्या टियर-१ भांडवलाला मजबूत करण्यासाठी करेल. यामुळे, कंपनीची कर्ज देण्याची क्षमता वाढेल आणि वेगाने वाढणाऱ्या एनबीएफसी क्षेत्रात आपला व्यवसाय आणखी वाढवता येईल. थोडक्यात, ही गुंतवणूक कंपनीची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील वाढ दोन्ही मजबूत करेल.

वाचा - FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

या मोठ्या आयपीओचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक मोठ्या गुंतवणूक बँका एकत्र आल्या आहेत, ज्यात कोटक महिंद्रा कॅपिटल, अॅक्सिस कॅपिटल, एचडीएफसी बँक आणि जेपी मॉर्गन यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

टॅग्स :टाटारतन टाटाशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार