Join us
Daily Top 2Weekly Top 5

Stock Markets Today: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला; IT, NBFC स्टॉक्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:47 IST

Stock Markets Today: शेअर बाजारात बुधवारी तेजीसह सुरुवात झाली असून, सलग तीन दिवसांपासून बाजारातील मजबुती कायम आहे.

Stock Markets Today: शेअर बाजारात बुधवारी (१८ मार्च) तेजीसह सुरुवात झाली असून, सलग तीन दिवसांपासून बाजारातील मजबुती कायम आहे. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारून ७६,५८५ च्या आसपास होता. निफ्टीदेखील १२० अंकांच्या तेजीसह २३,७०० च्या वर होता, तर बँक निफ्टी ११० अंकांनी वर होता. आज आयटी, ऑटो आणि NBFC शेअर्समध्ये चांगली मजबुती पाहायला मिळाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये प्रत्येकी १-१ टक्क्यांची दमदार वाढ होताना दिसत आहे.

आजचे टॉप गेनर्स आणि लूजर्स

निफ्टी ५० वर आज काही शेअर्समध्ये मोठी हालचाल पाहायला मिळाली:

टॉप गेनर्स : टीसीएस, जिओ फायनान्स, विप्रो, इंडिगो, अदानी एन्टरप्राईजेस, ट्रेंट, एचसीएल टेक, श्रीराम फायनान्स, आयशर मोटर्स आणि इन्फोसिस.

टॉप लूजर्स : कोल इंडिया, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, सिप्ला, टाटा कन्झुमर आणि कोटक बँक.

LPG च्या वापरात १७ टक्क्यांनी घट; मध्य-पूर्वेतील युद्धामुळे बदलली आकडेवारी

बाजारापुढील आव्हानं आणि जागतिक संकेत

मध्य-पूर्वेतील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमतींमधील मोठी वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री या पार्श्वभूमीवर बाजारासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. काल साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी बाजारानं चांगली कामगिरी केली; आता सलग तिसऱ्या दिवशी तेजीची 'हॅट्रिक' होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. जागतिक संकेत काहीसे सकारात्मक आहेत आणि देशांतर्गत पातळीवरही अनेक मोठे 'ट्रिगर्स' सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना सतर्क राहून ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Stock Market Rises for Third Day; Sensex Up 400 Points

Web Summary : Indian stock markets continue their upward trend for the third consecutive day. Sensex gained 400 points, supported by IT and NBFC stocks. Midcap and smallcap indices also showed strong growth. TCS and Jio Finance led gains, while Coal India and HDFC Bank were among the losers. Investors should remain cautious.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा