Join us

Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 09:54 IST

Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजारांनी सकारात्मक सुरुवात केली. निफ्टी २४,९०० च्या वर व्यवहार करत होता. सेन्सेक्स १०० अंकांनी वधारुन ८१,३०० च्या वर होता

Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजारांनी सकारात्मक सुरुवात केली. निफ्टी २४,९०० च्या वर व्यवहार करत होता. सेन्सेक्स १०० अंकांनी वधारुन ८१,३०० च्या वर होता. बँकिंग शेअर्समध्ये आज जोरदार तेजी दिसून आली. यामुळे बँक निफ्टी देखील २०० अंकांनी वाढून व्यवहार करत होता. मागील बंदच्या तुलनेत, सेन्सेक्स ६७ अंकांनी वाढून ८१,२७४ वर उघडला. निफ्टी २२ अंकांनी वाढून २४,९१६ वर उघडला आणि बँक निफ्टी २४५ अंकांनी वाढून ५५,८३४ वर उघडला. दरम्यान, चलन बाजारात, रुपया ३ पैशांनी मजबूत होऊन ८८.७४/ डॉलर्सवर उघडला.

ट्रिगर्सकडे पाहता, जागतिक बाजारपेठेत विक्रमी वाढ दिसून येत आहे. सोनं, चांदी, बिटकॉइन आणि बेस मेटल्सनी नवीन उच्चांक गाठलेत, परंतु एफआयआयकडून होणारी विक्री चिंतेचं कारण आहे. आज सकाळी निफ्टी निर्देशांकात घसरण झाली, परंतु जपानच्या निक्केई निर्देशांकात विक्रमी वाढ दिसून आली.

दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल

अमेरिकन बाजारांत पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक

शुक्रवारी अमेरिकन बाजारांनी नवीन उच्चांक गाठले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी सलग सहाव्या दिवशी जवळजवळ २५० अंकांनी वाढली, तर नॅस्डॅक विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर ६० अंकांनी घसरून बंद झाला. भारतीय बाजारांसाठी हे एक सकारात्मक संकेत आहे.

जपानचा निक्केई विक्रमी उच्चांकावर

जपानमध्ये पंतप्रधान म्हणून साने ताका यांची यांची निवड झाल्यानंतर निक्केई निर्देशांक १,९०० अंकांनी वाढला आणि तो आतापर्यंतच्या उच्चांकावर बंद झाला. आशियाई बाजारांसाठीही हा एक मजबूत संकेत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Share Market Opens Strong; Banking Stocks Surge, Nifty Above 24,910

Web Summary : Indian stock markets started positively, with Nifty above 24,910 and Sensex gaining. Banking shares saw significant gains, boosting Bank Nifty. Global markets show record growth, while Japan's Nikkei hits a new high.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा