Join us
Daily Top 2Weekly Top 5

Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स ११०० अंकांनी आपटला; निफ्टी २२,५०० च्या खाली, चहूबाजूंनी विक्रीचा सपाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 09:36 IST

Stock Markets Today: आज ३० मार्च रोजी जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड घसरणीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १,१०० अंकांनी कोसळला.

Stock Markets Today: आज ३० मार्च रोजी जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड घसरणीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १,१०० अंकांनी कोसळला, तर निफ्टी ३०० पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह २२,५०० च्या पातळीवर आला. बाजारात चौफेर विक्रीचा दबाव दिसून आला असून पीएसयू बँक इंडेक्स २ टक्क्यांहून अधिक खाली आला आहे. इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकदेखील रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत.

जागतिक संकेत कमकुवत; GIFT निफ्टीमध्ये मोठी पडझड

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे GIFT निफ्टी सुमारे २७५ अंकांनी घसरून २२,५५० च्या जवळ पोहोचला. तसंच डाओ फ्युचर्समध्येही २५० अंकांची घसरण झाली आहे. आशियाई बाजारांमध्ये जपान आणि दक्षिण कोरियाचे बाजार सुमारे ४-४ टक्क्यांनी कोसळलेत. उद्या मंगळवारी महावीर जयंतीनिमित्त बाजार बंद राहणार असल्यानं, आजच्या व्यवहारात मंथली एक्सपायरीची मोठी हालचाल पाहायला मिळेल.

१ एप्रिलपासून बदलणार ATM चे नियम! पाहा काय असेल Free आणि कशाचे लागतील पैसे, 'या' ३ बँकांनी जारी केले निर्देश

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ

युद्धाच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमधील तेजी कायम आहे. शुक्रवारपासून आतापर्यंत ब्रेंट क्रूड सुमारे ६ टक्क्यांनी वधारून १०८ डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचलंय. भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशासाठी महागडं तेल चिंतेचा विषय ठरू शकतं.

मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र; ३१ दिवसांपासून युद्ध सुरू

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव सतत वाढत आहे. इस्रायलनं इराणच्या अणू आणि औद्योगिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत, तर इराणने प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र हल्ला केला. ३१ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे परिस्थिती अधिक बिघडण्याचे संकेत मिळत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Stock Market Plummets: Sensex Drops 1100 Points Amid Global Concerns

Web Summary : Indian stock markets crashed due to negative global cues. Sensex fell by 1100 points, Nifty below 22,500. Middle East tensions, rising crude oil prices, and weak Asian markets fueled the sell-off. PSU banks suffered significant losses. Market closed Tuesday for Mahavir Jayanti.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकस्टॉक मार्केटपैसा