Join us

Stock Market Today: सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची तेजी, निफ्टी २४,४०० च्या वर; Adani Stocks टॉप गेनर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:53 IST

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी तेजी दिसून आली. ओपनिंगनंतर सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला होता. तर निफ्टीही जवळपास १०० अंकांच्या वाढीसह २४,४०० च्या वर व्यवहार करत होता.

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी तेजी दिसून आली. ओपनिंगनंतर सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला होता. तर निफ्टीही जवळपास १०० अंकांच्या वाढीसह २४,४०० च्या वर व्यवहार करत होता. बँक निफ्टी तब्बल ३०० अंकांनी वधारला. मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये किंचित तेजी होती. ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. दुसरीकडे रिलायन्समध्येही मोठी तेजी दिसून आली. अदानीचे शेअर्स हे निफ्टीत सर्वाधिक तेजीमध्ये होते.

निफ्टीवर अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्राइझ, जिओ फायनान्शियल्स, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंडाल्को यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. इटर्नलच्या शेअरमध्ये सर्वाधिक घस हा सर्वाधिक पराभूत झाला. याशिवाय जेएसडब्ल्यू, ओएनजीसी, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प मध्येही घसरण झाली. सेन्सेक्सवर अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँकमध्ये तेजी दिसून आली. टायटन, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांच्या शेअर्मध्येही घसरण झाली.

पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या

देशांतर्गत आघाडीवर सकारात्मक ट्रिगर आहेत. काल आर्थिक आघाडीवर मोठी बातमी आली. जीएसटी संकलन पहिल्यांदाच १२.६ टक्क्यांच्या वाढीसह २ लाख ३७ हजार कोटी झाले आहे. बुधवारी एफआयआयनं सलग अकराव्या दिवशी दोन वर्षांनंतर रोखीनं खरेदी केली. एफआयआयने ४४५० कोटी आणि देशांतर्गत फंडांनी १८०० कोटींची खरेदी केली. एप्रिलच्या रोजगाराच्या आकडेवारीपूर्वी डाऊ फ्युचर्सनं जवळपास ३०० अंकांची उसळी घेतली होती. निक्केई ४०० अंकांनी वधारला होता आणि चीनचे बाजार आज बंद आहेत.

टॅग्स :शेअर बाजारअदानी