Join us

शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:58 IST

Share Market Opening 12 June, 2025: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात फ्लॅट झाली. आज बीएसई सेन्सेक्स ५६.५३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८२,५७१.६७ अंकांवर उघडला.

Share Market Opening 12 June, 2025: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात फ्लॅट झाली. आज बीएसई सेन्सेक्स ५६.५३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८२,५७१.६७ अंकांवर उघडला. तर निफ्टी ५० २३.०५ अंकांच्या वाढीसह २५,१६४.४५ अंकांवर व्यवहार करत होता. बुधवारी सेन्सेक्स ८०.३४ अंकांच्या घसरणीसह ८२,३११.३८ अंकांवर उघडला होता. मात्र, बुधवारी निफ्टी ५० ची सुरुवात किरकोळ वाढीसह ग्रीन झोनमध्ये झाली होती.

गुरुवारी सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ११ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये उघडले आणि १७ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये उघडले, तर २ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. दुसरीकडे निफ्टी ५० च्या ५० पैकी २१ शेअर्सनं तेजीसह कामकाज करण्यास सुरुवात केली आणि उर्वरित २९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्सचे शेअर्स सर्वाधिक १.३० टक्क्यांनी वधारले, तर इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक १.२३ टक्क्यांनी घसरले.

एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?याशिवाय, आज सन फार्मा शेअर्स ०.६६ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.६५ टक्के, इंडसइंड बँक ०.४७ टक्के, भारती एअरटेल ०.४४ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.३६ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.२८ टक्के, अदानी पोर्ट्स ०.२० टक्के, बजाज फायनान्स ०.१६ टक्के, नेस्ले इंडिया ०.११ टक्के आणि अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स ०.०६ टक्क्यांनी वधारले. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मारुती सुझुकीचे शेअर्स आज कोणत्याही बदलाशिवाय उघडले.

या शेअर्समध्ये घसरण?

दुसरीकडे, एचसीएल टेकचे शेअर्स ०.५६ टक्के, टाटा स्टील ०.५४ टक्के, टाटा मोटर्स ०.४८ टक्के, टेक महिंद्रा ०.४५ टक्के, इटर्नल ०.३५ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.३५ टक्के, पॉवर ग्रिड ०.३४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.३० टक्के, टीसीएस ०.२४ टक्के, एचडीएफसी बँक ०.२१ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.१८ टक्के, आयटीसी ०.१३ टक्के, टायटन ०.१३ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.१० टक्के, आयसीआयसीआय बँक ०.०७ टक्के आणि एनटीपीसीचे शेअर्स ०.०१ टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :शेअर बाजार