Stock Market Today: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज सोमवार, २ फेब्रुवारी रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली असली, तरी काही वेळातच निर्देशांकांनी पुन्हा गती घेतली. सकाळी ९:२४ वाजता सेन्सेक्स २९४ अंकांच्या वाढीसह ८१,०१७ च्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी २४ अंकांच्या वाढीसह २४,८३५ च्या आसपास होता. बँक निफ्टीमध्ये मात्र १७ अंकांची किरकोळ घसरण होऊन तो ५८,३९९ वर पोहोचला.
क्षेत्रीय कामगिरीचा विचार करता, आज मेटल, सार्वजनिक व खाजगी बँका आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा कल राहिला. आयटी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्सनी सुरुवातीला चांगली तेजी दाखवली होती, परंतु काही वेळातच ते रेड झोनमध्ये म्हणजेच घसरणीसह व्यवहार करू लागले. बाजारातील अस्थिरता मोजणारा 'इंडिया VIX' सुरुवातीला १० टक्क्यांहून अधिक घसरला होता, मात्र नंतर तो पुन्हा स्थिर झाला.
शेअर बायबॅक टॅक्सवर Income Tax विभागाचं स्पष्टीकरण; समजावलं संपूर्ण गणित, जाणून घ्या
निफ्टी ५० वर आज एल अँड टी, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट, टाटा कन्झ्युमर, टीएमपीव्ही, इटर्नल आणि पॉवर ग्रीड या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. याउलट श्रीराम फायनान्स, मॅक्स हेल्थकेअर, आयटीसी, बजाज ऑटो, ट्रेंट, सिप्ला, जिओ फायनान्शिअल आणि टायटन या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.
आज सकाळच्या सत्रात बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स कालच्या तुलनेत १६७ अंकांनी घसरून ८०,५५५ वर, तर निफ्टी २९ अंकांच्या घसरणीसह २४,७९६ वर उघडला होता. बँक निफ्टीमध्ये १७८ अंकांची घट होऊन तो ५८,२३९ वर सुरू झाला होता. दरम्यान, चलनी बाजारात भारतीय रुपयाची कामगिरी सुधारली असून, तो २२ पैशांनी मजबूत होत प्रति डॉलर ९१.७६ या पातळीवर उघडला.
Web Summary : Indian stock market rebounded after an initial dip, with the Nifty surpassing 24,800. Metal, oil, and gas sectors led gains, while IT and pharma initially surged but later declined. Rupee strengthened against the dollar.
Web Summary : भारतीय शेयर बाजार शुरुआती गिरावट के बाद उभरा, निफ्टी 24,800 के पार। धातु, तेल और गैस क्षेत्रों में तेजी, जबकि आईटी और फार्मा में शुरू में तेजी आई लेकिन बाद में गिरावट आई। रुपये में डॉलर के मुकाबले मजबूती।