Stock Market Opening: कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजाराने मोठ्या वाढीसह सत्राची सुरुवात केली. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बाजार उघडताच, एका क्षणी बीएसई (BSE) सेन्सेक्स ६६३.६१ अंकांच्या वाढीसह ७८,२२९.७७ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. त्याच वेळी, एनएसई (NSE) निफ्टी देखील १९६.८५ अंकांच्या वाढीसह २४,२२४.९० च्या पातळीवर व्यवहार करत होता. शेअर बाजारात आज इंटरग्लोब एव्हिएशन, एशियन पेंट्स, श्रीराम फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. सेक्टोरल इंडेक्स आणि घसरण झालेले शेअर्स
दुसरीकडे ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, सिप्ला, कोल इंडिया आणि टेक महिंद्रा हे निफ्टीमधील प्रमुख 'लूझर स्टॉक्स' राहिले. क्षेत्रीय निर्देशांकाचा विचार केला तर, ऑईल अँड गॅस वगळता इतर जवळपास सर्वच क्षेत्रं ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. ऑटो, मेटल, फार्मा, पीएसयू बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये सुमारे १% ची वाढ दिसून येत असून बाजार सावरताना दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वक्तव्य आणि कच्च्या तेलाची किंमत घसरली; म्हणाले, "युद्ध लवकरच..."
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर बाजारात सुधारणा झाली. क्षेत्रातील सुरू असलेलं युद्ध लवकरच संपू शकते, असे संकेत ट्रम्प यांनी दिल्याने जागतिक तेल पुरवठ्यातील व्यत्ययाची भीती कमी झाली आहे. मंगळवारी 'ब्रेंट क्रूड'चा वायदा भाव ६.५१ डॉलर (सुमारे ६.६%) घसरून ९२.४५ डॉलर प्रति बॅरलवर आला.
तसंच, अमेरिकन 'वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट' (WTI) क्रूड ६.१२ डॉलर (सुमारे ६.५%) नं कमी होऊन ८८.६५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं.सोमवारी तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली होती आणि दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले होते. यादरम्यान ब्रेंट ११९.५० डॉलर आणि WTI ११९.४८ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते, जी २०२२ च्या मध्यानंतरची सर्वोच्च पातळी आहे.
Web Summary : Indian stock market surged following a drop in crude oil prices. The Sensex jumped over 660 points, with gains in Interglobe Aviation, Asian Paints, and Tata Steel. Oil and Gas sector lagged. Donald Trump's comments hinting at a potential end to regional conflict impacted prices.
Web Summary : कच्चे तेल की कीमतों में गिरावट के बाद भारतीय शेयर बाजार में तेजी आई। सेंसेक्स 660 अंकों से अधिक चढ़ा, इंटरग्लोब एविएशन, एशियन पेंट्स और टाटा स्टील में लाभ हुआ। तेल और गैस क्षेत्र पिछड़ा। डोनाल्ड ट्रम्प की टिप्पणी ने क्षेत्रीय संघर्ष के संभावित अंत का संकेत दिया, जिससे कीमतें प्रभावित हुईं।