Union Budget
Lokmat Money >शेअर बाजार > अर्थसंकल्पावर शेअर बाजार रूसला? सेन्सेक्स आणि निफ्टी निराशेने बंद; झोमॅटो ठरला टॉप गेनर

अर्थसंकल्पावर शेअर बाजार रूसला? सेन्सेक्स आणि निफ्टी निराशेने बंद; झोमॅटो ठरला टॉप गेनर

Sensex Reaction to Budget 2025 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, शेअर बाजाराला बजेट पसंत पडले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:46 IST2025-02-01T16:46:06+5:302025-02-01T16:46:06+5:30

Sensex Reaction to Budget 2025 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, शेअर बाजाराला बजेट पसंत पडले नाही.

stock market did not like the governments budget sensex and nifty closed with disappointment 2025 | अर्थसंकल्पावर शेअर बाजार रूसला? सेन्सेक्स आणि निफ्टी निराशेने बंद; झोमॅटो ठरला टॉप गेनर

अर्थसंकल्पावर शेअर बाजार रूसला? सेन्सेक्स आणि निफ्टी निराशेने बंद; झोमॅटो ठरला टॉप गेनर

Budget 2025 Stock Market Impact : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गावर सर्वाधिक भर देण्यात आला. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. मात्र, सरकारचे बजेट शेअर बाजाराला पसंत पडले नाही. शनिवारी सुट्टीच्या दिवशी उघडलेला शेअर बाजार निराशेने बंद झाला. आज BSE सेन्सेक्स ५.३९ अंकांच्या वाढीसह ७७,५०५.९६ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, NSE चा निफ्टी ५० निर्देशांक २६.२५ अंकांनी घसरून २३,४८२.१५ अंकांवर बंद झाला.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजारात घसरण
अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, बाजारात चांगली वाढ होत होती. परंतु, सरकारने उद्योगांसाठी कोणतीही विशेष घोषणा केली नाही. ज्यामुळे बाजाराने वेगाने कोसळला. त्यानंतर बाजारात सातत्याने चढउतार पाहायला मिळाले. शेवटी निफ्टी लाल चिन्हात बंद झाला तर सेन्सेक्स सपाट राहिला.

झोमॅटोच्या शेअर्समध्ये मोठी वाढ
शनिवारी सेन्सेक्समधील ३० पैकी १६ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित १४ कंपन्यांचे समभाग घसरणीसह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी ५० मधील ५० पैकी २२ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या चिन्हात बंद झाले. तर उर्वरित २८ कंपन्यांचे समभाग लाल चिन्हात तोट्याने बंद झाले. आज सेन्सेक्स कंपन्यांमध्ये झोमॅटोचे समभाग सर्वाधिक ७.१७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर पॉवर ग्रिडचे समभाग सर्वाधिक ३.७१ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

कोणत्या शेअरमध्ये चढउतार?
आज सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या इतर कंपन्यांचे शेअर्स ४.९८ टक्के, आयटीसी हॉटेल्स ४.७१ टक्के, आयटीसी ३.३३ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा २.९६ टक्के, एशियन पेंट्स २.१६ टक्के, टायटन १.८१ टक्के, इंडसइंड बँक १.७६ टक्के, बजाज फायनान्स १.५८ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग १.४५ टक्के, ॲक्सिस बँक १.२४ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.९८ टक्के, नेस्ले इंडिया ०.५० टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.३८ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.२४ टक्के आणि सन फार्मा ०.०५ टक्के वाढीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये घसरण
अर्थसंकल्पाच्या दिवशी लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स ३.३६ टक्के, एनटीपीसी २.०४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट २.०३ टक्के, एचसीएल टेक १.८७ टक्के, टेक महिंद्रा १.६५ टक्के, इन्फोसिस १.५० टक्के, अदानी पोर्ट्स १.४७ टक्के, टाटा मोटर्स १.३८ टक्के, टाटा स्टील १.२६ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया ०.९१ टक्के, टीसीएस ०.८६ टक्के, एचडीएफसी बँक ०.५५ टक्के आणि भारती एअरटेल ०.२६ टक्क्यांनी घसरले.
 

Web Title: stock market did not like the governments budget sensex and nifty closed with disappointment 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.