Share Market: भारतीय शेअर बाजारासाठी ९ एप्रिलची सकाळ निराशाजनक ठरली. जागतिक बाजारातून मिळणारे संमिश्र संकेत आणि देशांतर्गत स्तरावर सुरू असलेली अस्थिरता यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही रेड झोनमध्ये उघडले. विक्रीच्या प्रचंड दबावामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी चिंता दिसून आली, ज्यामुळे बाजार उघडताच सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला. त्यानंतर त्यात आणखी घसरण झाली.
आज सकाळी व्यवहार सुरू होताच बीएसई सेन्सेक्स ५३१.५९ अंकांनी घसरुन ७७,०३१.३१ च्या पातळीवर आला. दुसरीकडे, एनएसई निफ्टी देखील १५३.८० अंकांच्या घसरणीसह २३,८४३.५५ वर पोहोचला.
कोणत्या शेअर्समध्ये झाली हालचाल?
आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात एनटीपीसी (NTPC), भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), मॅक्स हेल्थकेअर, बजाज ऑटो आणि हिंदाल्को यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूती दिसून आली. याउलट, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस आणि महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) यांसारखी मोठी नावं विक्रीच्या दबावाखाली राहिली आणि 'टॉप लूजर्स'च्या यादीत सामील झाली. बाजारातील आकडेवारीनुसार, सुमारे १२१५ शेअर्समध्ये तेजी दिसली, तर १२८८ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. तसेच १७४ शेअर्सच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही.
घसरणीची मुख्य कारणं
तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली अस्थिरता आणि अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधीबाबत गुंतवणूकदारांच्या मनात असलेली शंका ही घसरणीची प्रमुख कारणे आहेत. शस्त्रसंधीची घोषणा झाली असली तरी, पुरवठा साखळी आणि जागतिक आर्थिक स्थितीबाबत व्यापारी अजूनही 'वेट अँड वॉच' अशा भूमिकेत आहेत. याशिवाय, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FIIs) होत असलेल्या विक्रीमुळेही देशांतर्गत बाजारावर दबाव निर्माण झालाय.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सध्या बाजारात मोठा चढ-उतार पाहायला मिळू शकतो. अशा परिस्थितीत लहान गुंतवणूकदारांनी घाईघाईनं मोठे निर्णय घेणं टाळलं पाहिजे. चांगल्या फंडामेंटल्स असलेल्या शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक कायम ठेवणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
Web Summary : Indian stock markets faced a disappointing morning with Sensex plunging over 500 points and Nifty falling below 23,900 due to global cues and domestic instability. NTPC and BEL showed strength, while Bajaj Finance and Adani Ports faced selling pressure. Experts advise caution amid market volatility.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में निराशाजनक शुरुआत हुई, सेंसेक्स 500 अंक से अधिक और निफ्टी 23,900 से नीचे गिरा। वैश्विक संकेतों और घरेलू अस्थिरता के कारण गिरावट आई। एनटीपीसी और बीईएल में मजबूती, जबकि बजाज फाइनेंस पर दबाव रहा। विशेषज्ञों ने बाजार में उतार-चढ़ाव के बीच सावधानी बरतने की सलाह दी है।