Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयटी आणि फार्मा शेअर्सची धूम! निफ्टीने ओलांडला २५,२०० चा टप्पा; कच्चे तेल मात्र स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:35 IST

Stock Market Highlights: सकारात्मक जागतिक संकेतांचा देशांतर्गत शेअर बाजारावर परिणाम झाला. क्षेत्रीयदृष्ट्या, रिअल्टी आणि ग्राहकोपयोगी वस्तू वगळता सर्व क्षेत्रे हिरव्या रंगात बंद झाली.

Stock Market : जागतिक स्तरावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काबाबत घेतलेल्या मवाळ भूमिकेचे सकारात्मक पडसाद गुरुवारी भारतीय शेअर बाजारात उमटले. गेल्या तीन सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीला पूर्णविराम देत बाजार आज जोमाने सावरला. आयटी, फार्मा आणि मेटल क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने पुन्हा एकदा ८२,३०० चा टप्पा गाठला.

आज बाजारात एकूण २,८०३ शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर १,२३५ शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही प्रत्येकी १ टक्क्याची वाढ झाल्याने बाजारात सर्वसमावेशक मजबूतीचे संकेत मिळाले आहेत.

कोणते शेअर्स ठरले 'हिरो'?आजच्या तेजीत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस आणि टाटा स्टील या शेअर्सनी बाजी मारली. दुसरीकडे, एसबीआय लाईफ, एटरनल, आयशर मोटर्स आणि टायटन या शेअर्समध्ये मात्र नफेखोरी पाहायला मिळाली.

रुपयाची ऐतिहासिक नीचांकावरून सावरत रिकव्हरीडॉलरच्या तुलनेत विक्रमी तळाला गेलेल्या रुपयाने गुरुवारी थोडा दिलासा दिला. आरबीआयचा संभाव्य हस्तक्षेप आणि ट्रम्प यांनी १ फेब्रुवारीपासून लागू होणारे जागतिक टॅरिफ तूर्तास न लावण्याचे संकेत दिल्याने रुपया ३ पैशांनी सावरला. रुपयाचा बंद भाव आज ९१.६२ रुपये प्रति डॉलर राहिला. बुधवारी रुपया ९१.६५ च्या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी स्तरावर बंद झाला होता.

वाचा - ६ कोटींचे पॅकेज अन् १० लाख 'पोटगी' टाळण्यासाठी सोडली नोकरी! भारतीय व्यक्तीला कोर्टाने शिकवला धडा

कच्च्या तेलाच्या दरात घसरणजागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा ओव्हरसप्लाय (जादा पुरवठा) होण्याची शक्यता निर्माण झाल्याने दरात घसरण झाली. फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी कच्चे तेल ३५ रुपयांनी घसरून ५,५३४ रुपये प्रति बॅरलवर आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : IT, Pharma Stocks Surge; Nifty Crosses 25,200; Crude Oil Cheaper.

Web Summary : Indian stock market rebounds on positive global cues, led by IT and Pharma. Sensex hits 82,300. Rupee recovers. Crude oil prices decline due to oversupply concerns.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटनिर्देशांकटॅरिफ युद्धमाहिती तंत्रज्ञान