Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vodafone Idea मध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी इच्छुक दिग्गज कंपन्या; अमेरिकन कंपनीही शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:14 IST

Vodafone Idea News: दोन मोठ्या कंपन्या व्होडाफोन आयडिया मधील भागीदारी खरेदी करू इच्छित आहेत. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या आणि पाहा काय आहे सर्वाधिक असलेल्या सरकारचा प्लॅन.

Vodafone Idea News: दोन मोठ्या कंपन्या व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) मधील भागीदारी खरेदी करू इच्छित आहेत. सिंगापूरची कंपनी ST Telemedia आणि JSW ग्रुप या टेलिकॉम कंपनीचा काही हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, केंद्र सरकारकडून मिळालेल्या आर्थिक दिलास्यानंतर गुंतवणूकदारांचा वोडाफोन आयडियामधील रस वाढला आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारकडे सध्या वोडाफोन आयडियाचा सर्वाधिक हिस्सा आहे.

अमेरिकन कंपनीदेखील शर्यतीत 

ईटीच्या वृत्तानुसार, अमेरिकेची टिलमॅन ग्लोबल होल्डिंग्स ही कंपनीदेखील वोडाफोन आयडियामध्ये भागीदारी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहे. याशिवाय, देशांतर्गत स्तरावर इतरही अनेक कंपन्यांचं या कंपनीकडे लक्ष आहे. मात्र, सध्या हे संपूर्ण प्रकरण प्राथमिक टप्प्यावर आहे. गेल्या महिन्यात अशी बातमी आली होती की, सरकार एका अशा धोरणात्मक गुंतवणूकदाराच्या शोधात आहे, जो ११ ते १३ टक्के भागीदारीच्या बदल्यात कंपनीत १ बिलियन डॉलरची गुंतवणूक करेल.

NHAI चा झटका, प्रवास महागणार, १ एप्रिलपासून वार्षिक टोल पास ₹३,००० नाही, तर इतक्या रुपयांना मिळणार

कंपनीची महत्त्वाची बैठक

या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनुसार, काही गुंतवणूकदार कंपनीतील भागीदारीबाबत अत्यंत गंभीर आहेत. १६ आणि १७ मार्च रोजी कंपनी सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसोबत बैठक घेणार आहे. सरकारला अशा गुंतवणूकदाराची प्रतीक्षा आहे जो कंपनीत पैसे गुंतवेल आणि तिचं संचालन करेल. सध्या वोडाफोन आयडियामध्ये सरकारची एकूण ४९ टक्के भागीदारी आहे. आदित्य बिर्ला ग्रुप आणि ब्रिटनचा वोडाफोन ग्रुप पीएलसी हे याचे प्रवर्तक आहेत. या कंपनीत आदित्य बिर्ला ग्रुपकडे ९.५० टक्के, तर वोडाफोन ग्रुपकडे १६.०७ टक्के हिस्सा आहे.

शेअर्सची कामगिरी कशी?

शुक्रवारी वोडाफोन आयडियाचा शेअर ३.३४ टक्क्यांच्या घसरणीसह ९.२६ रुपये पातळीवर बंद झाला होता. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत २० टक्क्यांची वाढ झाली आहे, तर एका वर्षात व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सचा भाव ३३ टक्क्यांनी वधारला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Vodafone Idea Attracts Big Investors; American Firm in the Race

Web Summary : Vodafone Idea sees interest from ST Telemedia, JSW Group, and Tillman Global. Investors are encouraged by government relief. The government currently holds the largest stake in Vodafone Idea. The company will meet with institutional investors in Singapore and Hong Kong.
टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)शेअर बाजारगुंतवणूक