Join us

अदानींवरील आरोपाच्या २ वर्षातच हिंडेनबर्गचा बाजार उठला; दुसरीकडे Adaniना 'अच्छे दिन'; शेअर्स सुस्साट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:34 IST

Adani Group Shares : अदानी समूहाचे १०० अब्ज डॉलरचे शेअर्स विकण्यामागे कारणीभूत असलेली शॉर्टसेलर हिंडेनबर्ग रिसर्च बंद झाल्यानंतर गुरुवारी अदानी समूहाच्या कंपन्यांना अच्छे दिन आले आहेत.

Adani Group Shares : अदानी समूहाचे १०० अब्ज डॉलरचे शेअर्स विकण्यामागे कारणीभूत असलेली शॉर्टसेलर हिंडेनबर्ग रिसर्च बंद झाल्यानंतर गुरुवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारातच अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स अँड सेझ, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट, एसीसी आणि एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.

हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी २०२३ रोजी अदानी समूहाविरोधात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. शॉर्टसेलरने अदानी समूहावर ऑफशोर टॅक्स हेवनचा गैरवापर केल्याचा आरोप केला मात्र अदानी समूहानं हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अदानींच्या शेअरमध्ये वाढ

सकाळच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून २,४८८.२५ रुपयांवर कामकाज करत होता. तर अदानी पॉवरचा शेअर ५.०७ टक्क्यांनी वधारून ५७७.३० रुपयांवर व्यवहार करत होता. अदानी ग्रीनचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून १०८६.४० रुपयांवर तर अदानी पोर्ट्सचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ११७१.१० रुपयांवर कामकाज करत होता.

अदानी विल्मरच्या शेअरमध्येही तेजी दिसून आली. तर दुसरीकडे अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर २.२८ टक्क्यांनी वधारून ७९७.९० रुपयांवर आला. अदानी टोटल गॅस ३.३७ टक्क्यांनी वधारून ६८४.६० रुपयांवर व्यवहार करत होता. एसीसी ३.७८ टक्क्यांनी वधारून २,०४४.१५ रुपयांवर आला. तर अंबुजा सिमेंटचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ५३९.९५ रुपयांवर तर एनडीटीव्हीचा शेअर ३.३३ टक्क्यांनी वधारून १५२.२० रुपयांवर व्यवहार करत होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूकर करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार