Join us
Daily Top 2Weekly Top 5

Share Market Today: शेअर बाजारात तेजी, पण इराणनं ट्रम्प यांचा चर्चेचा दावा फेटाळला; बाजारावर काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:39 IST

Share Market Today: शेअर बाजारात मंगळवारी व्यवहाराची सुरुवात वाढीसह झाली आणि सेन्सेक्स १५१६ अंकांच्या वाढीसह ७४,२१२ च्या पातळीवर उघडला.

Share Market Today: शेअर बाजारात मंगळवारी व्यवहाराची सुरुवात वाढीसह झाली आणि सेन्सेक्स १५१६ अंकांच्या वाढीसह ७४,२१२ च्या पातळीवर उघडला. निफ्टीमध्ये ३६६ अंकांच्या वाढीसह २२,८७८ च्या पातळीवर व्यवहाराला सुरुवात झाली. मात्र काही वेळानं ही तेजी कमी झाली. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे, ते इराणच्या पॉवर प्लांटवर पुढील पाच दिवसांपर्यंत कोणताही हल्ला करणार नाहीत आणि इराणशी अत्यंत अर्थपूर्ण चर्चा सुरू असल्याची माहिती दिली होती. यानंतर अमेरिकन बाजारपेठेत तेजी दिसून आली. मात्र, इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाल्याचा दावा फेटाळला. इराणनं ट्रम्प यांच्या दाव्यांचं खंडन केल्यामुळे बाजारपेठेत अनिश्चितता पसरू शकते.

इराणने फेटाळले ट्रम्प यांचे दावे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले हंते की, इराणसोबत व्यापक करारापर्यंत पोहोचण्यासाठी चर्चा सुरू आहे. "यावेळी इराण गंभीर असून त्यांना करार करायचा आहे. त्यांना शांतता हवी आहे," असंही त्यांनी नमूद केलं होतं. मात्र, इराणनं अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा झाल्याचं नाकारलं. इराणच्या संसदीय अध्यक्षांनी म्हटलंय की, असे दावे म्हणजे 'फेक न्यूज' असून त्यांचा वापर आर्थिक आणि कच्च्या तेल बाजारपेठांमध्ये फेरफार करण्यासाठी केला जात आहे.

बँक FD विसरुन जाल! पोस्टाची ही स्कीम करेल मालामाल; २ लाख जमा केल्यास मिळेल ९० हजारांचं व्याज

कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

ट्रम्प यांच्या चर्चेच्या दाव्यांनंतर आणि इराणच्या वीज प्रकल्पांवरील हल्ले पाच दिवसांसाठी पुढे ढकलण्याच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ११ टक्क्यांची घसरण झाली होती. परंतु, इराणनं त्याचं खंडन केल्यानंतर मंगळवारी कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढू लागले. मंगळवारी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेली. ब्रेंट क्रूड २.९ टक्क्यांनी वाढून १०२.८४ डॉलरवर पोहोचलं, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) ३.५ टक्क्यांनी वाढून ९१.२० डॉलरवर पोहोचलं.

सोमवारी ट्रम्प यांच्या त्या विधानानंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती, ज्यामध्ये त्यांनी, इराणसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी इराणच्या वीज प्रकल्पांवरील हल्ले पाच दिवसांसाठी लांबणीवर टाकले असल्याचं म्हटलं होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Share Market Rises, Iran Denies Trump Talks: Market Impact?

Web Summary : Share market opened higher but pared gains after Iran denied Trump's claim of talks. Oil prices surged as Iran refuted discussions, creating market uncertainty. Investors are watching crude prices.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसाअमेरिका-इस्रायल-इराण वॉर