Join us
Daily Top 2Weekly Top 5

Share Market Today: जागतिक तणावाचा भारतीय शेअर बाजाराला तडाखा, सेन्सेक्स १३१६ अंकांनी कोसळला; निफ्टी २३,००० च्या खाली, 'हे' स्टॉक्स घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 10:01 IST

Share Market Today: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झाल्यामुळे आणि जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी मोठ्या घसरणीसह उघडला.

Share Market Today: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झाल्यामुळे आणि जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी मोठ्या घसरणीसह उघडला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स १३१६.७६ अंकांनी घसरून ७३,२१६.२० च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसई (NSE) निफ्टी-५० देखील ४२०.३० अंकांनी घसरुन २२,६९४.२० वर आला. 

१७ एप्रिल २०२५ नंतर पहिल्यांदाच निफ्टी २३,००० च्या खाली घसरला आहे. निफ्टीवर हिंदाल्को, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एचडीएफसी बँक यांसारख्या दिग्गज शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली, तर दुसरीकडे मॅक्स हेल्थकेअर आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये रिकव्हरीसह वाढ दिसून येत आहे.

Tata Sierra साठी २ लाखांचं डाऊन पेमेंट केलं तर किती लागेल EMI, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन

सर्वच क्षेत्र रेड झोनमध्ये आणि विक्रीचा दबाव

क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार केला तर सर्वच सेक्टर सध्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. ऑटो, मीडिया, बँकिंग, मेटल आणि पीएसयू बँक इंडेक्समध्ये सुमारे २ टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही मोठी विक्री दिसून येत असून हे निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक घसरलेत, ज्यामुळे बाजारातील कमकुवतपणाचं वातावरण स्पष्ट होत आहे.

बाजार कोसळण्यामागची प्रमुख कारणं 

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित चढ-उतार पाहायला मिळाले. ब्रेंट क्रूड ०.६६ टक्क्यांनी घसरून १११.४५ डॉलर प्रति बॅरलवर आले, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) ०.०८ टक्क्यांच्या हलक्या घसरणीसह ९८.१६ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते. बाजारातील या पडझडीमागे भू-राजकीय तणाव हे सर्वात मोठं कारण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की, जर इराणनं ४८ तासांच्या आत 'होर्मुजची सामुद्रधुनी' पूर्णपणे उघडली नाही, तर अमेरिका त्यांचे पॉवर प्लांट्स उद्ध्वस्त करेल. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही आक्रमक भूमिका घेतली. तसंच अमेरिकेनं कोणतीही लष्करी कारवाई केल्यास ते आखाती क्षेत्रातील ऊर्जा प्रकल्प आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प नष्ट करतील, असा इशारा दिला.

आशियाई आणि अमेरिकन बाजारावर परिणाम

पश्चिम आशियातील हा तणाव चौथ्या आठवड्यात पोहोचल्यानं आशिया-पॅसिफिक बाजारात मोठी घसरण झाली आहे. जपान आणि दक्षिण कोरियाचे प्रमुख निर्देशांक ५ टक्क्यांहून अधिक घसरल्यानं जपानमध्ये भीतीचे वातावरण आहे. या तणावाचा परिणाम अमेरिकन बाजारावरही दिसून येत असून तेथील फ्युचर्स रेड झोनमध्ये आहेत. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज फ्युचर्स सपाट स्तरावर असले तरी एस अँड पी ५०० फ्युचर्स ०.१ टक्के आणि नॅस्डॅक-१०० फ्युचर्स ०.२ टक्क्यांनी घसरलेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Share Market Crashes Amid Global Tensions; Sensex Plunges 1316 Points

Web Summary : Geopolitical tensions triggered a sharp market decline. Sensex plummeted 1316 points, Nifty below 23,000. All sectors traded in the red, with significant drops in auto, media, and banking. Asian markets also felt the impact.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा