Join us

रिलायन्सने मिळवला सर्वाधिक नफा, तर SBI चे 8,299 कोटी बुडाले, पाहा आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 16:46 IST

Share Market Tips : जाणून घ्या गेल्या आठवड्यातील टॉप-10 कंपन्यांची कामगिरी.

Share Market Tips : गेला आठवडा काही कंपन्यांसाठी खूप चांगला ठरला आहे. सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल (एम-कॅप) एकूण 2,03,010.73 कोटी रुपयांनी वाढले. शेअर बाजारातील पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेची सर्वाधिक वाढ झाली. बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 780.45 अंकांनी किंवा 1.19 टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी सेन्सेक्स 66,060.90 अंकांच्या नव्या सार्वकालिक उच्चांकावर बंद झाला.

रिलायन्सला 69,990.57 कोटींचा फायदा झाला

सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांमधील रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 69,990.57 कोटी रुपयांनी वाढून 18,53,033.73 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. TCS चे मार्केट कॅप 68,168.12 कोटी रुपयांनी वाढून 12,85,058.84 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. इन्फोसिसचे मार्केट कॅप 39,094.81 कोटी रुपयांनी वाढून 5,91,547.67 कोटी रुपये झाले आहे. तसेच, भारती एअरटेलचे मार्केट कॅप 10,272.84 कोटी रुपयांनी वाढून 4,95,116.94 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

SBI ला 8,299.89 कोटींचा तोटा

ICICI बँकेचे मार्केट कॅप 10,135.42 कोटी रुपयांनी वाढून 6,72,837.72 कोटी रुपयांवर पोहोचले. तर, HDFC बँकेचे मार्केट कॅप 8,695.25 कोटी रुपयांनी घसरून 9,19,962.74 कोटी रुपये झाले. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजारमूल्य 8,299.89 कोटी रुपयांनी घसरून 5,21,598.94 कोटी रुपये झाले. म्हणजेच एसबीआयला 8,299.89 कोटींचा तोटा झाला आहे. 

या आहेत टॉप-10 कंपन्याटॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, एसबीआय, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :रिलायन्सशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकएसबीआय