Join us

Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:03 IST

Share Market Opening 3 September, 2025: बुधवारी, भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा ग्रीन झोनमध्ये तेजीसह व्यवहार करू लागला. आज सलग तिसरा दिवस आहे जेव्हा बाजारानं वाढीसह सुरुवात केली आहे.

Share Market Opening 3 September, 2025: बुधवारी, भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा ग्रीन झोनमध्ये तेजीसह व्यवहार करू लागला. आज सलग तिसरा दिवस आहे जेव्हा बाजारानं वाढीसह सुरुवात केली आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, आज बीएसई सेन्सेक्स १३८.११ अंकांच्या (०.१७%) वाढीसह ८०,२९५.९९ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी ५० निर्देशांक देखील आज ३६.९० अंकांच्या (०.१५%) वाढीसह २४,६१६.५० अंकांवर उघडला. मंगळवारी सेन्सेक्स १५५.६० अंकांच्या (०.१९%) वाढीसह ८०,५२०.०९ अंकांवर उघडला आणि निफ्टी २७.९५ अंकांच्या (०.११%) वाढीसह २४,६५३.०० अंकांवर उघडला. परंतु, शेवटी बाजार मोठ्या घसरणीसह लाल चिन्हावर बंद झाला.

बुधवारी, सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी १९ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले आणि १० कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात उघडले. तर टेक महिंद्राचे शेअर्स आज कोणताही बदल न होता उघडले. त्याचप्रमाणे, निफ्टीमधील ५० कंपन्यांपैकी २७ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात उघडले आणि उर्वरित २१ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात उघडले आणि २ कंपन्यांचे शेअर्स कोणताही बदल न होता उघडले. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, इटर्नलचे शेअर्स आज सर्वाधिक १.९४ टक्के वाढीसह उघडले आणि टायटनचे शेअर्स आज सर्वाधिक ०.५६ टक्के घसरणीसह उघडले.

EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी

'या' शेअर्समध्ये तेजी/घसरण

सेन्सेक्सच्या इतर कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर, आज महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स १.६९ टक्के, टीसीएस ०.८० टक्के, पॉवर ग्रिड ०.७३ टक्के, टाटा स्टील ०.६३ टक्के, टाटा मोटर्स ०.५४ टक्के, अदानी पोर्ट्स ०.५१ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया ०.४९ टक्के, बीईएल ०.४५ टक्के, आयटीसी ०.४३ टक्के, एनटीपीसी ०.४० टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.३८ टक्के, ट्रेंट ०.२६ टक्के, एचसीएल टेक ०.२६ टक्के, सन फार्मा ०.२४ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.२२ टक्के, एल अँड टी ०.२१ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.१८ टक्के आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स ०.०७ टक्क्यांनी वधारले.

दुसरीकडे, इन्फोसिसचे शेअर्स ०.४४ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.३७ टक्के, भारती एअरटेल ०.३१ टक्के, एशियन पेंट्स ०.३० टक्के, बजाज फायनान्स ०.३० टक्के, मारुती सुझुकी ०.२२ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.१९ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.१६ टक्के आणि अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स ०.१४ टक्क्यांनी घसरून उघडले.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा