Join us

लॉटरी लागली! मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने एका दिवसांत कमावले तब्बल ₹79 कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 22:30 IST

Stock Market: शेअर बाजारात कुणाचे नशीब कधी बदलेल, सांगता येत नाही

Stock Market News: शेअर बाजार नशीबाचा खेळ आहे. कधी कुणाचे नशीब पालटेल, सांगता येत नाही. तुम्ही जोखीम घेऊन शेअर बाजारातून बंपर परतावा मिळवू शकता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांनी फक्त एका दिवसांत शेअर बाजारातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. 

नारा भुवनेश्वरी यांनी ज्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यापैकी एका शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हा शेअर हेरिटेज फूड्स लिमिटेडचा आहे. ही डेअरी कंपनी हेरिटेज फूड्स लिमिटेड १९९२ मध्ये सुरू झाली होती आणि ती दक्षिण भारतातही खूप लोकप्रिय आहे. या गुंतवणूकीतून त्यांनी सुमारे ७९ कोटी रुपये कमावले आहेत.

नारा भुवनेश्वरीने जॅकपॉट मारला

तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी सुरू केलेले हेरिटेज ग्रुप दुग्धव्यवसाय, किरकोळ विक्री आणि शेती क्षेत्रात काम करते. शुक्रवारी शेअर बाजार कोसळला असला तरी, या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे सात टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर, शेअरची किंमत ४९३.२५ रुपयांपर्यंत वाढली.

शेअरच्या किमतीत झालेल्या या वाढीनंतर, नारा भुवनेश्वरींनी एका दिवसात ७८,८०,११,६४६ रुपयांची प्रचंड कमाई केली आहे. नारा भुवनेश्वरी हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीत त्यांचा २४.३७ टक्के हिस्सा, म्हणजेच २,२६,११,५२५ शेअर्स आहेत.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारचंद्राबाबू नायडूआंध्र प्रदेश