Join us

EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:00 IST

Servotech Renewable Power Systems Limited: कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी तेजी पाहायला मिळाली. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९६.९८ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ९७.५५ रुपये आहे.

भारतातील रिन्यूएबल एनर्जी (Renewable Energy) आणि ईव्ही चार्जिंग (EV Charging) तंत्रज्ञानातील प्रमुख कंपनी सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे (Servotech Renewable Power Systems Limited) शेअर्स आज गुरुवारी व्यवहारादरम्यान फकसमध्ये होते. कंपनीचे शेअर्स आज एनएसईवर जवळपास २% नं वाढून १२५.५० रुपयांवर पोहोचले.

शेअर्समधील या वाढीमागे एक घोषणा आहे. कंपनीनं बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला आपला ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. यानंतर शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९६.९८ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ९७.५५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २,८१४.७१ कोटी रुपये आहे.

सोनं, शेअर की रिअल इस्टेट; कुठून मिळाले सर्वाधिक रिटर्न?

कंपनी काय म्हणाली?

कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, या भागीदारी अंतर्गत सोनू सूद सर्वोटेकच्या ब्रँड फिल्म्स, डिजिटल मोहीम आणि ३६०-डिग्री मार्केटिंग कॅम्पसमध्ये दिसतील. ते कंपनीचे 'Produce green, live green' हे मिशन देश आणि जगापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

हे सहकार्य कंपनीची ग्रीन एनर्जी आणि शाश्वत विकासाची दृष्टी अधिक मजबूत करेल. सोनू सूद यांची प्रतिमा एक प्रेरणादायक, जबाबदार आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक व्यक्तीची आहे, जी सर्वोटेकच्या स्वच्छ ऊर्जा मोहिमेला नवी ओळख मिळवून देण्यास मदत करेल, असंही त्यांनी नमूद केलं.

कंपनीचा व्यवसाय

सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम्स ही भारतात सौर ऊर्जा, ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे. भारताला जागतिक स्तरावर स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे केंद्र बनवणं हे कंपनीचं लक्ष्य आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Investors flock to EV charging company linked to Sonu Sood.

Web Summary : Servotech Renewable Power shares surged after announcing Sonu Sood as brand ambassador. Shares hit ₹125.50. The company aims to promote green energy with Sood's help, focusing on sustainable development and clean energy initiatives across India.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा