Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात 'बड्यां'ची दमछाक! ७ कंपन्यांना ७५ हजार कोटींचा फटका; कोणाला किती नुकसान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 16:46 IST

Sensex Top 10 Firms Update : गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि लार्सन अँड टुब्रो यांचे बाजार भांडवल घटले.

Sensex Top 10 Firms Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या सुट्टीमुळे केवळ ४ दिवसांच्या व्यापारी सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. १६ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या बाजार भांडवलात ७५,५४९.८९ कोटी रुपयांची मोठी घट झाली आहे. याउलट, उर्वरित ३ कंपन्यांनी मात्र गुंतवणूकदारांना दिलासा देत आपल्या मूल्यात ७५,८५५.४३ कोटी रुपयांची भर घातली आहे.

सेन्सेक्स स्थिर, निफ्टीची संथ गतीबीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार बंद असल्याने या आठवड्यात केवळ चार सत्रांमध्ये व्यवहार झाले. आठवडाअखेर बीएसई सेन्सेक्स ५.८९ अंकांनी घसरला, तर निफ्टी ११.०५ अंकांच्या किरकोळ वाढीसह बंद झाला. या संमिश्र वातावरणात बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील काही शेअर्सनी बाजार सावरण्याचे काम केले.

कोणाचे नुकसान, कोणाचे नुकसान?१. रिलायन्सला 'सर्वात मोठा' धक्कादेशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार मूल्यात सर्वाधिक २३,९५२.४८ कोटी रुपयांची घसरण झाली. यामुळे कंपनीचे एकूण मार्केट कॅप १९,७२,४९३.२१ कोटी रुपयांवर आले आहे.

२. 'या' कंपन्यांचीही झाली घसरण

  • लार्सन अँड टुब्रो : २३,५०१.८ कोटी रुपयांची घट (एकूण मूल्य: ५,३०,४१०.२३ कोटी).
  • एचडीएफसी बँक : ११,६१५.३५ कोटी रुपयांचे नुकसान.
  • भारती एअरटेल : ६,४४३.३८ कोटी रुपयांची घसरण.
  • बजाज फायनान्स व हिंदुस्थान युनिलिव्हर : अनुक्रमे ६,२५३ कोटी आणि ३,३१२ कोटी रुपयांनी मूल्य घटले.
  • टीसीएस : टीसीएसच्या मूल्यात ४७०.३६ कोटींची किरकोळ घट झाली.

वाचा - होम लोन घेताय? बँकेकडून १००% कर्ज का मिळत नाही? वाचा आरबीआयचे नियम

गुंतवणूकदारांची चांदी करणाऱ्या ३ कंपन्या

  • बाजार घसरत असतानाही तीन बड्या कंपन्यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली. 
  • भारतीय स्टेट बँक : सर्वाधिक ३९,०४५.५१ कोटी रुपयांची वाढ नोंदवत ९,६२,१०७.२७ कोटींच्या पार गेली.
  • इन्फोसिस : ३१,०१४.५९ कोटी रुपयांची वाढ.
  • आयसीआयसीआय बँक : ५,७९५.३३ कोटी रुपयांच्या वाढीसह १० लाखांच्या क्लबमध्ये स्थान टिकवून ठेवले. 
English
हिंदी सारांश
Web Title : Top firms face market turbulence, ₹75,000 crore loss for seven.

Web Summary : Indian stock market volatility caused ₹75,549 crore loss for seven top companies. Reliance faced the biggest hit. SBI, Infosys, and ICICI Bank gained significantly amid mixed market performance.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकरिलायन्स