SEBI Digital Platform: शेअर बाजाराची सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी SEBI ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. SEBI ने तीन नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करत बाजारातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि डेटा सुरक्षिततेला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
तीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च
SEBI कडून सुरू करण्यात आलेले तीन प्रमुख प्लॅटफॉर्म पुढीलप्रमाणे आहेत:
- SUPCOMS (Single Universal Platform for Communications)
- ई-अॅडज्युडिकेशन पोर्टल
- C-SAC (Cyber Security Audit Compliance)
हे प्लॅटफॉर्म पारंपरिक प्रक्रियांना डिजिटल आणि अधिक सुरक्षित बनवण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहेत.
SUPCOMS: सुरक्षित संवादासाठी एकत्रित प्रणाली
SUPCOMS हा एक केंद्रीकृत कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म असून, सर्व अधिकृत संवाद एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यास मदत करतो.यामुळे डेटा ट्रॅकिंग सोपे होणार असून ईमेल आधारित संवाद अधिक संरक्षित होईल.
ई-अॅडज्युडिकेशन पोर्टल: कायदेशीर प्रक्रिया ऑनलाइन
या पोर्टलमुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होणार आहे. कंपन्यांना नोटिस ऑनलाइन पाहता येतील, उत्तर सादर करता येईल आणि व्हर्च्युअल सुनावणीत सहभागी होता येईल. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढण्यास मदत होईल.
C-SAC: AI आधारित सायबर सुरक्षा निरीक्षण
C-SAC हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित प्लॅटफॉर्म असून, सायबर ऑडिट रिपोर्टचे विश्लेषण करून संभाव्य धोके आणि त्रुटी ओळखतो. तसेच संस्थांना रिस्क स्कोर देऊन सायबर सुरक्षेची पातळी मोजण्यास मदत करतो.
डिजिटल बाजारात सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल
वित्तीय बाजार वेगाने डिजिटल होत असताना सायबर हल्ल्यांचा धोका वाढत आहे. फसवणूक आणि डेटा चोरीच्या घटनाही वाढत आहेत. अशा परिस्थितीत SEBI चा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे शेअर बाजारातील व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
Web Summary : SEBI launches three digital platforms—SUPCOMS, e-Adjudication Portal, and C-SAC—to bolster stock market cybersecurity. These initiatives aim to enhance transparency, efficiency, and data security, safeguarding digital financial transactions.
Web Summary : सेबी ने शेयर बाजार साइबर सुरक्षा को मजबूत करने के लिए तीन डिजिटल प्लेटफॉर्म- SUPCOMS, ई-एडज्यूडिकेशन पोर्टल और C-SAC लॉन्च किए। इन पहलों का उद्देश्य पारदर्शिता, दक्षता और डेटा सुरक्षा को बढ़ाना है, जिससे डिजिटल वित्तीय लेनदेन सुरक्षित होंगे।