Join us

दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:24 IST

Samvardhan Motherson Bonus Share: मल्टीबॅगर कंपनी त्यांच्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देणार आहे. कंपनी तिच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक २ शेअर्समागे १ बोनस शेअर देईल.

Samvardhan Motherson Bonus Share: मल्टीबॅगर कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल त्यांच्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देणार आहे. संवर्धन मदरसन २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे. म्हणजेच, कंपनी तिच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक २ शेअर्समागे १ बोनस शेअर देईल. बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट शुक्रवार, १८ जुलै २०२५ आहे. २००० पासून कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची ही दहावी वेळ आहे. ऑटो कंपोनेंट उद्योगात गुंतलेल्या या कंपनीचे शेअर्स गुरुवारी १५५.३५ रुपयांवर व्यवहार करत होते.

डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी

कधी दिलेत बोनस शेअर्स?

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल २००० पासून १० व्यांदा बोनस शेअर्स देणार आहे. या मल्टीबॅगर कंपनीनं २०००, २००५, २००७, २०१२, २०१३, २०१५, २०१७, २०१८ आणि २०२२ मध्ये बोनस शेअर्सचं वाटप केलं आहे. आता कंपनी २०२५ मध्ये दहाव्यांदा बोनस शेअर्स वितरित करणार आहे. कंपनीनं प्रत्येक वेळी २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच, मल्टीबॅगर कंपनीने प्रत्येक २ शेअर्ससाठी १ बोनस शेअर भेट दिला आहे.

दोनदा केलंय स्टॉक स्प्लिट

संवर्धन मदरसन इंटरनॅशनलनंही त्यांचे शेअर्स दोनदा स्प्लिट केले आहेत. कंपनीनं ऑक्टोबर २००२ मध्ये त्यांचे शेअर्स दोन भागात विभागले. कंपनीनं १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सचं ५ रुपये फेस व्हॅल्यू मूल्य असलेल्या २ शेअर्समध्ये विभाजन केलं. कंपनीनं मार्च २००४ मध्ये आपले शेअर्स ५ भागांत विभागले. कंपनीने ५ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सचं १ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या ५ शेअर्समध्ये विभाजन केलं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा