Join us

Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:40 IST

Reliance Infra Share Price: कंपनीचे शेअर्स १.१% वाढले आणि ४०४.९० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. पाहा काय आहे कंपनीचा प्लान?

Reliance Infra Share Price: आज कामकाजादरम्यान अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (RInfra) शेअर्स फोकसमध्ये आहेत. कंपनीचे शेअर्स १.१% वाढले आणि ४०४.९० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. दरम्यान, काही काळानंतर त्यात १% पर्यंत घट झाली. आरइन्फ्रानं बुधवारी शेअर बाजारांना सांगितलं की, कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत क्वालिफाइड इन्स्टिट्यूशन्स प्लेसमेंट (क्यूआयपी) किंवा फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे (एफपीओ) ९,००० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

अधिक तपशील काय?

कंपनीच्या निवेदनानुसार, उभारण्यात आलेल्या ९००० कोटी रुपयांपैकी ६००० कोटी रुपये QIP/FPO द्वारे उभारले जातील आणि उर्वरित ३००० कोटी रुपये खाजगी प्लेसमेंट आधारावर सुरक्षित/असुरक्षित, रिडीमेबल, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करून उभारले जातील. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही एक भारतीय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे जी वीज निर्मिती, पारेषण, वितरण आणि व्यापार तसंच रस्ते, मेट्रो रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रात गुंतलेली आहे.

मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?

कंपनीच्या शेअरच्या किंमतीचा इतिहास

गेल्या एका महिन्यात या शेअरनं ५.३१% वाढ झालीये, जे सेन्सेक्स (१.०२%) आणि बीएसई युटिलिटीज निर्देशांक (३.६३%) पेक्षा जास्त आहे. वार्षिक (YTD) आधारावर, शेअर २५.४२% नं वधारला आहे, जो सेन्सेक्सच्या ५.२६% वाढीपेक्षा आणि युटिलिटीज निर्देशांकाच्या १.४२% वाढीपेक्षा खूपच जास्त आहे. रिलायन्स इन्फ्रानं एका वर्षात १११.१०% इतका मोठा परतावा दिला. तीन वर्षांच्या कालावधीत ही कामगिरी आणखी प्रभावी आहे. तीन वर्षांत या शेअरमध्ये ३०२.७७% वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स १,१२२.९१% पर्यंत वधारलेत. या कालावधीत, हा शेअर ३२ रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढलाय.(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सशेअर बाजार