Reliance AGM 2025 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) अध्यक्ष मुकेश अंबानी आज, २९ ऑगस्ट रोजी कंपनीच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करणार आहेत. या बैठकीकडे कंपनीच्या ४४ लाखाहून अधिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. शेअर बाजाराला अपेक्षा आहे की, या बैठकीत मुकेश अंबानीजिओच्या आयपीओसह अनेक मोठ्या घोषणा करू शकतात.
रिलायन्स इंडस्ट्रीजची (RIL) ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. या बैठकीत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आरआयएलच्या ४४ लाखाहून अधिक भागधारकांची यावर बारीक नजर आहे.
शेअर बाजाराची नजर विशेषतः जिओ आणि रिटेल व्यवसायाशी संबंधित कोणत्याही घोषणेवर आहे. ही घोषणा दलाल स्ट्रीटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक असू शकते, असे मानले जात आहे. रिलायन्सच्या या बैठकीत मुकेश अंबानी कोणत्या मोठ्या घोषणा करू शकतात, हे जाणून घेऊया.
आयपीओबद्दल मोठे अपडेट अपेक्षितअनेक वर्षांपूर्वी रिलायन्सने सांगितले होते की ते टेलिकॉम (जिओ) आणि रिटेल व्यवसाय पाच वर्षांत सार्वजनिक करतील. पण अद्याप याबद्दल कोणतीही ठोस तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या एजीएममध्ये २०२५ मध्ये जिओ आणि रिटेलचा आयपीओ येणार की नाही, याबद्दल स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
एआयवर मोठा अपडेट – 'जिओब्रेन'गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी 'जिओब्रेन' नावाच्या एआय सेवा प्लॅटफॉर्मची घोषणा केली होती, ज्यात देशभरातील एआय डेटा सेंटर आणि सेवांचा समावेश होता. या वर्षीही गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे की, या एआय प्लॅटफॉर्ममधील नवीन सेवा आणि भागीदारींबद्दल मोठा अपडेट मिळू शकतो.
ग्रीन एनर्जी आणि नवी ऊर्जा प्रकल्परिलायन्सने मोठे सौर आणि बॅटरी गिगा-फॅक्ट्रीज स्थापन केल्या आहेत, ज्यात सोलर मॉड्यूल, इलेक्ट्रोलायझर आणि बॅटरीच्या उत्पादन लाईन्सचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांतून २०२५ पासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. एजीएममध्ये यांच्या कामकाजाबद्दल, उत्पादनाबद्दल आणि संभाव्य नफ्याबद्दल अपेक्षित माहिती मिळू शकते.
वाचा - दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
जिओ आणि रिटेलसह इतर व्यावसायिक क्षेत्रांचा विस्तारमुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षी म्हटले होते की, २०३० पर्यंत जिओ आणि रिटेल व्यवसाय दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. या एजीएममध्ये या उद्दिष्टाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली जाईल. याशिवाय, जिओ हॉटस्टार, एफएमसीजी आणि फास्ट फॅशन (शीनसह भागीदारी) यांसारख्या इतर व्यवसायांबद्दलच्या अपडेट्सवरही गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.