Federal Bank Share: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी नोंदवली गेली. बँकेचे शेअर्स आज कामकाजादरम्यान ७ टक्के वाढून २२७.९० रुपयांवर पोहोचले. बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे (Q2) निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली, ज्यामुळे ते आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचले. या तेजीमुळे दिग्गज गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांना काही मिनिटांतच सुमारे ₹६७ कोटींचा नफा झाला.
शेअरमधील वाढ आणि मार्केट कामगिरी
सोमवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात फेडरल बँकेचा शेअर ५.३४% ने वाढून ₹२२३.७५ च्या नवीन उच्चांकावर पोहोचला होता. ही वाढ मागील बंद पातळी ₹२१२.४० पेक्षा ₹११.३५ अधिक होती. कामकाजादरम्यान ५.२२ लाख शेअर्सची खरेदी-विक्री झाली, ज्यामुळे एकूण ₹११.५१ कोटींचा टर्नओव्हर नोंदवला गेला. बँकेचे मार्केट कॅप वाढून ₹५३,९७६ कोटींवर पोहोचलं. या शेअरनं या वर्षात ३ मार्च २०२५ रोजी आपली ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ₹१७२.९५ गाठली होती, त्यानंतर यात सतत सुधारणा दिसून आली आहे. परंतु, नंतर या शेअरमध्ये ७ टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली गेली.
रेखा झुनझुनवाला यांचा हिस्सा
सप्टेंबर २०२५ तिमाहीच्या अखेरीस रेखा राकेश झुनझुनवाला यांच्याकडे फेडरल बँकेचे ५.९० कोटी शेअर्स होते, जे बँकेतील २.४२ टक्के हिस्स्याइतके आहेत. शेअर्सच्या किमतीत सोमवारी आलेल्या ₹११.३५ प्रति शेअरच्या वाढीमुळे त्यांना एकूण जवळपास ₹६७ कोटींचा लाभ झाला. अशा प्रकारे, बाजार उघडताच काही मिनिटांतच त्यांच्या गुंतवणुकीच्या मूल्यामध्ये जबरदस्त वाढ नोंदवली गेली.
टार्गेट प्राईस किती?
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने फेडरल बँकेची कामगिरी 'मजबूत' असल्याचं सांगितलं आहे आणि बँकेचा PAT (Profit After Tax) अंदाज FY26 आणि FY27 साठी ५% पर्यंत वाढवला आहे. “आम्ही अपेक्षा करतो की बँक FY27 मध्ये १.१९% RoA आणि १२.८% RoE साध्य करेल. आम्ही बायची शिफारस कायम ठेवली आहे आणि टार्गेट प्राईस ₹२५० निश्चित केलं आहे,” असं त्यांनी रिपोर्टमध्ये नमूद केलंय. मोतीलाल ओसवालच्या मते Q2 च्या निकालांमध्ये बँकेनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, विशेषतः नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) मध्ये कामगिरी चांगली आहे. कंपनीनं FY26 साठी ५५ बेसिस पॉइंटची (bps) क्रेडिट कॉस्ट गाइडन्स पुन्हा सांगितली आहे. ब्रोकरेज फर्म नुवामा ने देखील फेडरल बँकेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे आणि शेअरचं टार्गेट प्राईज ₹२४५ निश्चित केलंय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Federal Bank shares surged after strong Q2 results, boosting Rekha Jhunjhunwala's portfolio by ₹67 crore. Brokerages predict further growth, with targets reaching ₹250.
Web Summary : फेडरल बैंक के शेयरों में Q2 के मजबूत नतीजों के बाद उछाल आया, जिससे रेखा झुनझुनवाला के पोर्टफोलियो में ₹67 करोड़ की वृद्धि हुई। ब्रोकरेज ने ₹250 तक के लक्ष्य के साथ आगे और विकास की भविष्यवाणी की है।