Ravelcare IPO Listing: रेवेलकेअरचे शेअर्स सोमवार, ८ डिसेंबरला बाजारात लिस्ट होणार आहेत. कंपनीच्या शेअर्सचा सध्याचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) बंपर लिस्टिंगचे संकेत देत आहे. सध्याच्या GMP नुसार, रेवेलकेअरचे शेअर्स पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचू शकतात. याचा अर्थ, लिस्टिंगवर गुंतवणूकदारांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. रेवेलकेअरचे शेअर्स सध्या ५७ टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह व्यवहार करत आहेत. कंपनीचा आयपीओ बोली लावण्यासाठी १ डिसेंबरला उघडला होता आणि तो ३ डिसेंबरपर्यंत खुला राहिला. रेवेलकेअरच्या आयपीओवर ४३७ पटाहून अधिक बोली लागली.
१३० रुपयांचा शेअर, ७५ रुपये GMP
आयपीओमध्ये रेवेलकेअरच्या शेअरचा दर १३० रुपये आहे. तर, ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ७५ रुपयांच्या प्रीमियमवर आहेत. सध्याच्या ग्रे मार्केट प्रीमियमनुसार पाहिलं तर रेवेलकेअरचे शेअर्स बाजारात सुमारे २०५ रुपयांना लिस्ट होऊ शकतात. म्हणजेच, आयपीओमध्ये ज्या गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स मिळतील, ते लिस्टिंगच्या दिवशी ५७ टक्क्यांहून अधिक फायद्याची अपेक्षा करू शकतात. रेवेलकेअरचे शेअर्स ८ डिसेंबरला बाजारात लिस्ट होतील. रेवेलकेअरच्या आयपीओचा एकूण आकार २४.१० कोटी रुपयांपर्यंतचा आहे. रेवेलकेअर लिमिटेडचे शेअर्स बीएसईच्या एसएमई (SME) प्लॅटफॉर्मवर लिस्ट होतील.
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
कंपनी काय करते?
रेवेलकेअर लिमिटेडची सुरुवात नोव्हेंबर २०१८ मध्ये झाली आहे. रेवेलकेअर एक डिजिटल-फर्स्ट ब्युटी अँड पर्सनल केअर ब्रँड आहे, जी हेअरकेअर, स्किनकेअर, बॉडीकेअरची विस्तृत श्रेणी ऑफर करते. रेवेलकेअर आपली वेबसाइट आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्राद्वारे व्यवसाय चालवते. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रेवेलकेअर लिमिटेडनं आपला विस्तार जागतिक बाजारपेठेत वाढवला. कंपनीचे प्रोडक्ट्स सध्या युएई, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, अमेरिका आणि सौदी अरेबियामध्येदेखील उपलब्ध आहेत.
आयपीओवर ४३७ पटाहून अधिक बोली
रेवेलकेअर लिमिटेडच्या आयपीओवर एकूण ४३७.६० पट बोली लागली आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ४६३.१३ पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ७५२.१६ पट बोली लागली. रेवेलकेअरच्या आयपीओमध्ये क्वॉलीफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा १५५.९१ पट सब्सक्राइब झाला आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदार २ लॉटसाठी बोली लावू शकत होते. आयपीओच्या २ लॉटमध्ये २००० शेअर्स होते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Ravelcare IPO shares are set to list on December 8th, potentially exceeding ₹200. The IPO was oversubscribed 437 times, with significant premium expected. The company operates a digital-first beauty and personal care brand with global reach.
Web Summary : रेवेलकेयर आईपीओ के शेयर 8 दिसंबर को लिस्ट होने वाले हैं, संभावित रूप से ₹200 से अधिक। आईपीओ को 437 गुना सब्सक्राइब किया गया, जिसमें महत्वपूर्ण प्रीमियम की उम्मीद है। कंपनी एक डिजिटल-फर्स्ट ब्यूटी और पर्सनल केयर ब्रांड का संचालन करती है जिसकी वैश्विक पहुंच है।