Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त बॉलिवूडच नाही, 'धुरंधर-२' चा शेअर बाजारातही धुमाकूळ, PVR Inox मालामाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:55 IST

PVR INOX share Jumps: ‘धुरंधर-२’ची पहिल्याच दिवशी सुमारे १०० कोटी रुपयांहून अधिकची कमाई!

PVR INOX share Jumps: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर-१’ नंतर आता ‘धुरंधर-२’ देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले असून, याच्या कमाईने फक्त चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर शेअर बाजारातही आपला प्रभाव दाखवला आहे. चित्रपटाला मिळालेल्या शानदार ओपनिंगनंतर मल्टीप्लेक्स चेन PVR Inox च्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली. 

शेअर बाजारावर ‘धुरंधर-२’चा धुमाकूळ

‘धुरंधर-२’ने पहिल्याच दिवशी सुमारे १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठा विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात कंपनीचा शेअर सुमारे ३.५० टक्क्यांनी वाढून १००० रुपयांच्या पुढे गेला. चित्रपटाच्या यशाचा थेट परिणाम PVR Inox च्या मार्केट कॅपवरही दिसून आला. यामुळे कंपनीच्या बाजारमूल्यात सुमारे ३६० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ‘धुरंधर-२’ची कमाई पुढील काही दिवसांतही वेगाने वाढण्याची शक्यता असून, हा चित्रपट लवकरच १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो. OTT प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही या चित्रपटाने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात यश मिळवले, हे विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, दीर्घ काळानंतर एखादा चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना सिनेमागृहात आणण्यात यशस्वी ठरला आहे.

PVR Inox शेअर्समध्ये आठवडाभरात ५.६% वाढ

BSE वर १३ मार्चपासून PVR Inox च्या शेअर्समध्ये सुमारे ५.६० टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी हा शेअर ३.७० टक्क्यांच्या वाढीसह १०२९ रुपयांवर व्यवहार करत होता. त्याआधी सकाळच्या सत्रात तो १.३४ टक्क्यांनी वाढून १००५.६० रुपयांपर्यंत पोहोचला होता. यासह कंपनीचे मार्केट कॅपही वाढून १०,१०४ कोटी रुपये झाले असून, यापूर्वी ते ९,७४४ कोटी रुपये होते.

(विशेष सूचना- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar-2' rocks box office and stock market; PVR Inox gains.

Web Summary : ‘Dhurandhar-2’'s success boosts PVR Inox shares by 3.5%, exceeding ₹1000. First-day earnings surpassed ₹100 crore, increasing market cap by ₹360 crore. Experts predict continued growth, potentially reaching ₹1000 crore, drawing audiences back to theaters.
टॅग्स :धुरंधर सिनेमाशेअर बाजारस्टॉक मार्केट