Join us

एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:14 IST

Pidilite Industries Ltd: पाहा कोणती आहे ही कंपनी आणि कधी मिळणार गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स आणि डिविडंड

Pidilite Industries Ltd: बुधवारी व्यवहारादरम्यान अ‍ॅडहेसिव्ह मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पिडिलाईट इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स फोकसमध्ये होते. कंपनीचे शेअर्स आज २% नं वाढले आणि ३०५९ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. शेअर्समधील या वाढीमागील कारण जून तिमाहीतील उत्कृष्ट निकाल आहेत. याशिवाय, कंपनीनं बोनस शेअर्स आणि लाभांश देखील जाहीर केला आहे.

बोनस शेअर्सची घोषणा

पिडिलाईटच्या बोर्डानं १:१ च्या प्रमाणात प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर जारी करण्यास मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे रेकॉर्ड डेटपर्यंत कंपनीचा एक शेअर असेल तर तुम्हाला एक शेअर अतिरिक्त मिळेल. बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. बोर्डानं प्रति शेअर ₹ १० चा विशेष लाभांश देखील मंजूर केला आहे, ज्यासाठी रेकॉर्ड डेट १३ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस

कंपनीच्या शेअर्सनी दीर्घकाळात मजबूत परतावा दिला आहे. पाच वर्षांत १२५ टक्के आणि १९९९ पासून ४८,००० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत ३,४१४.४० रुपये आहे आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत २,६२०.१५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,५४,५००.६० कोटी रुपये आहे.

जून तिमाही निकाल

जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर १८.७% वाढून ₹६७८ कोटी झाला. तिमाहीतील महसूल वार्षिक आधारावर १०.५% वाढून ₹३,७५३ कोटी झाला. तिमाहीतील व्याज, कर, डेप्रिसिएशन आणि कर्जमाफीपूर्वीचे उत्पन्न (EBITDA) वाढून ₹९४१ कोटी झाले, जे वार्षिक आधारावर १६% वाढलं. तिमाहीतील EBITDA मार्जिन मागील वर्षाच्या तुलनेत ११० बेसिस पॉइंट्सनं वाढून २५% झालं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा