Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेटीएमनंतर आता 'फोनपे'ची बारी! एप्रिलमध्ये येणार धमाका आयपीओ; गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 16:29 IST

PhonePe IPO : फोनपे एप्रिलमध्ये आयपीओ आणण्याचे लक्ष्य ठेवत आहे. ही एक थेट ऑफर फॉर सेल असेल, ज्यामध्ये वॉलमार्ट, मायक्रोसॉफ्ट आणि टायगर ग्लोबल सारख्या कंपन्या ५०.६ दशलक्ष शेअर्सची विक्री करतील.

PhonePe IPO : भारतातील युपीआय व्यवहारांमधील आघाडीची कंपनी 'फोनपे' आगामी एप्रिल महिन्यात आपला बहुप्रतिक्षित आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. डिजिटल पेमेंट बाजारपेठेत ४५ टक्क्यांहून अधिक हिस्सा असलेल्या या दिग्गज कंपनीने भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यासाठी कंबर कसली असून, विस्तारासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे.

१. पूर्णपणे 'ऑफर फॉर सेल' असणार इश्युसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनपेचा हा आयपीओ पूर्णपणे 'विक्री ऑफर' (Offer For Sale) स्वरूपाचा असेल. यामध्ये वॉलमार्ट, मायक्रोसॉफ्ट आणि टायगर ग्लोबल यांसारखे विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे सुमारे ५.०६ कोटी शेअर्स विकणार आहेत. या आयपीओमध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. जानेवारी महिन्यातच कंपनीला 'सेबी'कडून या आयपीओसाठी मंजुरी मिळाली आहे.

२. 'प्रायव्हेट' ते 'पब्लिक': कायदेशीर प्रक्रिया पूर्णभारतीय शेअर बाजारात लिस्टिंगसाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया कंपनीने पूर्ण केली आहे. १६ एप्रिल रोजी फोनपेचे रूपांतर 'खाजगी' मधून 'पब्लिक लिमिटेड' कंपनीत करण्यात आले. यामुळे गुंतवणुकीचे नवे मार्ग खुले झाले आहेत.

३. डिजिटल व्यवहारांत 'फोनपे'चा दबदबाभारतातील डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये फोनपे सध्या निर्विवाद राजा आहे. फोनपेचा ४५% बाजारपेठेवर कब्जा. तर गुगल पे ३५% हिश्श्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीच्या मते, भारतातील डिजिटल पेमेंटची बाजारपेठ २०३० पर्यंत ६०२ ते ६८१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते, ज्याचा फायदा घेण्यासाठी कंपनी सज्ज आहे.

वाचा - १३व्या वर्षी दूध आणि पेपर टाकत सुरुवात; आज ४०० अलिशान गाड्यांचा मालक; एका निर्णयाने बदललं आयुष्य

४. उत्पन्नाचे नवे स्रोतकेवळ पेमेंटवर अवलंबून न राहता फोनपे आता आपल्या वित्तीय सेवांचा विस्तार करत आहे. कंपनी विमा आणि कर्ज वितरण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. गुंतवणूकदारांसाठी ‘शेअर.मार्केट’ आणि स्वदेशी अ‍ॅप स्टोअर ‘इंडस अ‍ॅपस्टोर’ यांसारख्या प्लॅटफॉर्मवर भर दिला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PhonePe IPO buzz intensifies; April launch anticipated by investors.

Web Summary : PhonePe's IPO, a complete offer for sale, is expected in April after receiving SEBI approval. The digital payment giant, holding 45% market share, aims for expansion, diversifying into financial services like insurance and lending, and exploring new platforms.
टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारसेबीस्टॉक मार्केट