Zomato Q3 Results : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने अनेक खवय्यांची घरबसल्या सोय केली. पूर्वी बाहेर जेवायला जायचं म्हणजे जीवावर यायचं. तयार व्हा, गाडी बाहेर काढा, मग वाहतूक कोंडीतून कशीबशी वाट काढा. त्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये वेटींगसाठी थांबा. मात्र, ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने ही सर्व कटकटच संपवली. आता अर्ध्या रात्री जरी भूक लागली तरी तुम्हाला घरपोच जेवण मिळू शकते. दरम्यान, ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी झोमॅटोवरून ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करणे बंद केले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, ज्यामुळे कंपनीचा तोटा वाढत आहे?
झोमॅटोची कामगिरी कशी होती?झोमॅटोने ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तिसऱ्या तिमाहीत झोमॅटोच्या महसुलात ६४% वाढ झाली आहे. तर झोमॅटोने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ५९ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर त्यात ५७% ने घट झाली आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने १३८ कोटी रुपयांचा एकत्रित नफा कमावला होता. यापूर्वी, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत झोमॅटोने ३,२८८ कोटी रुपयांची कमाई केली होती.
जर आपण तिमाही-दर-तिमाही निकालांवर नजर टाकली तर, कंपनीने दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत ६६.४७% कमी नफा कमावला आहे. जुलै-सप्टेंबर २०२४ मध्ये कंपनीला १७६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
निकालांचा शेअर्सवर परिणामकंपनीचे तिमाही निकालानंतर गुंतवणूकदार नाराज झाले. कारण तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स झपाट्याने घसरले. आज मंगळवारीही शेअरमध्ये ७ टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅपही १.९६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
का झाले नुकसान?उत्पन्नापेक्षा वेगाने वाढलेला कंपनीचा वाढता खर्च हे त्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. झोमॅटोचा क्विक कॉमर्स बिझनेस ब्लिंकिटला तिसऱ्या तिमाहीत १०३ कोटी रुपयांचा मोठा तोटा झाला आहे. कंपनीच्या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत ११७% आणि जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत २१% वाढ झाली आहे.
काय आहे नवीन लक्ष्य?झोमॅटोची भागीदार कंपनी ब्लिंकिटच्या मते, २०२५ च्या अखेरीस २००० स्टोअर्सपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. ब्लिंकिटने या तिमाहीत १,००० स्टोअर्सचा टप्पा ओलांडला आहे.