Join us

PC Jewellers Share Price : वर्षभरात ५००% पेक्षा अधिक तेजी, आता १० भागांत स्प्लिट होणार 'हा' शेअर; रेकॉर्ड डेट कधी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 15:48 IST

PC Jewellers Share Price : कंपनीचा शेअर सोमवारी बीएसईवर ५ टक्क्यांनी वधारून १७१.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच दिवसांत ज्वेलरी कंपनीच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

PC Jewellers Share Price : ज्वेलरी कंपनी पीसी ज्वेलर्सचा शेअर सोमवारी बीएसईवर ५ टक्क्यांनी वधारून १७१.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच दिवसांत ज्वेलरी कंपनीच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ५०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. कंपनीनं आपले शेअर्स स्प्लिट करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनी १:१० या प्रमाणात आपले शेअर्स स्प्लिट करत आहे. म्हणजेच कंपनी आपल्या शेअर्सचं १० भागांमध्ये विभाजन करत आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १८६.८० रुपये असून त्यांचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २७.६६ रुपये आहे.

कधी आहे रेकॉर्ड डेट

मल्टिबॅगर कंपनी पीसी ज्वेलर्स आपल्या शेअर्सना १० भागांमध्ये स्प्लिट करत आहे. यानंतर ज्वेलरी कंपनी १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरची फेस व्हॅल्यू १ रुपया होईल. कंपनीने शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट १६ डिसेंबर २०२४ निश्चित केली आहे. पीसी ज्वेलर्सनं आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देखील भेट दिले आहेत. कंपनीनं जुलै २०१७ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक १ शेअरमागे १ बोनस शेअर दिला आहे.

वर्षभरात ५०० टक्क्यांहून अधिक वाढ

पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी ज्वेलरी कंपनीचा शेअर २८.५० रुपयांवर होता. पीसी ज्वेलर्सचा शेअर २ डिसेंबर २०२४ रोजी १७१.५० रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये सुमारे २४१ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर ५०.३५ रुपयांवर होता. २ डिसेंबर ०२४ रोजी कंपनीचा शेअर १७० रुपयांच्या वर पोहोचला आहे. गेल्या ६ महिन्यांत पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये २५२ टक्क्यांची वाढ झाली. तर या काळात कंपनीचा शेअर ४८.७३ रुपयांवरून १७१.५० रुपयांवर पोहोचला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :सोनंशेअर बाजारगुंतवणूक