Join us

₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:38 IST

फिनटेक कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत एक्सपर्टदेखील 'बुलिश' आहेत. त्यांचं मत आहे की, येत्या काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव १६०० रुपये पर्यंत जाऊ शकतो. पाहा काय म्हटलंय एक्सपर्ट्सनं.

Paytm Share Price: पेटीएमची पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्सच्या (One97 Communications) शेअर्समध्ये आज ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ नोंदवली गेली. पेटीएमच्या पॅरेंट कंपनीनं मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर तिमाही निकालांची घोषणा केली होती. फिनटेक कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत एक्सपर्टदेखील 'बुलिश' आहेत. त्यांचं मत आहे की, येत्या काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव १६०० रुपये पर्यंत जाऊ शकतो.

बीएसईमध्ये आज कंपनीचा शेअर १३०२.३५ रुपये पातळीवर उघडला होता. कामकाजादरम्यान, कंपनीच्या शेअर्सचा भाव ५ टक्क्यांनी वाढून १३३१.८० रुपये च्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला.

मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

२१ कोटी रुपयांचा नफा

पेटीएमने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर तिमाहीदरम्यान कंपनीचा एकूण निव्वळ नफा २१ कोटी रुपये राहिला आहे. फिनटेक कंपनीचा महसूल २४ टक्क्यांनी वाढून यावेळी २०६१ कोटी रुपये झाला. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत पेटीएमच्या पॅरेंट कंपनीचा महसूल १६५९ कोटी रुपये होता.

एक्सपर्ट 'बुलिश'

सीएनबीसी टीव्ही१८ च्या रिपोर्टनुसार, या स्टॉकच्या कामगिरीबद्दल तज्ज्ञ 'बुलिश' आहेत. ब्रोकरेज फर्म सिटीनं याला 'BUY' रेटिंग दिलंय आणि १५०० रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ब्रोकरेज हाऊस जेफरीजनं या स्टॉकसाठी १६०० रुपयांची टार्गेट प्राईज देत 'BUY' रेटिंग दिलंय.

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी?

जिथे एका बाजूला अनेक कंपन्या गेल्या एका वर्षात शेअर बाजारात संघर्ष करताना दिसल्या, तिथं पेटीएमनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. १ वर्षात पेटीएमच्या शेअर्सचा भाव ६६.३७ टक्क्यांनी वाढला आहे. २०२५ बद्दल बोलायचं झाल्यास, पेटीएमच्या शेअर्सच्या किमतींमध्ये ३४.४३ टक्के वाढ झाली आहे, जी सेन्सेक्स इंडेक्सच्या ६.२५ टक्के परताव्याच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Paytm Share Price Target Upto ₹1600, Experts Bullish

Web Summary : Paytm's shares surged after strong quarterly results, with a net profit of ₹21 crore. Experts predict the share price could reach ₹1600, giving it a 'BUY' rating. The stock has shown strong returns compared to the Sensex.
टॅग्स :पे-टीएमशेअर बाजारगुंतवणूकपैसा