Join us

पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:20 IST

pakistan stock market : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घोषित झाल्याचा परिणाम कराची शेअर बाजारातही पाहायला मिळाला.

pakistan stock market :पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या संकटातून जात आहे. सरकार चालवण्यासाठी देखील कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे ओपरेशन सिंदूरनंतर कराची शेअर बाजारात भूकंप आला. एका दिवसात बाजार ७ टक्के घसरला होता. दरम्यान, बाजार आणखी तळाला जाऊ नये यासाठी व्यवहार बंद करण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली. आता युद्धविराम घोषित केल्यानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. बाजाराने एका दिवसात ९ टक्क्यांची झेप घेतली आहे. मात्र, ही वाढ देखील बाजाराला झेपली नसल्याचे दिसत आहे. कारण, दुपारी तब्बल १ तास सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते.

भारतासोबत युद्धबंदीच्या घोषणेनंतर आज, १२ मे रोजी पाकिस्तान शेअर बाजाराचा केएसई-१०० निर्देशांक ९% ने वाढला. बाजारात आलेल्या या तेजीनंतर, तासभर व्यवहार थांबवावे लागले. दरम्यान, आता व्यवहार पुन्हा सुरू झाले असून कराची -१०० निर्देशांक ९,४०० अंकांच्या वाढीसह १,१६,५७० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. यापूर्वी, पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ७ आणि ८ मे रोजी दोन दिवसांत बाजार १०,००० पेक्षा जास्त अंकांनी (सुमारे ११%) घसरला होता.

पाकिस्तानी बाजारपेठेत वाढ होण्याची २ कारणेआयएमएफकडून मिळालेली २०,००० कोटी रुपयांची मदत ही तेजीचे कारण आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मंडळाने ९ मे रोजी पाकिस्तानला क्लायमेट रेझिलियन्स लोन प्रोग्राम अंतर्गत १.४ अब्ज डॉलर्सचे (सुमारे १२ हजार कोटी रुपये) नवीन कर्ज दिले. यासोबतच, विस्तारित निधी सुविधा (EFF) अंतर्गत मिळालेल्या ७ अब्ज डॉलर (सुमारे ६० हजार कोटी रुपये) च्या मदतीचा पहिला आढावा देखील मंजूर करण्यात आला. यामुळे पाकिस्तानला पुढील हप्त्यापैकी १ अब्ज डॉलर्स (सुमारे ८,५४२ कोटी रुपये) मिळतील. या बातमीनंतर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामभारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवार १० मे रोजी युद्धविराम घोषित करण्यात आला. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५:०० वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाली.

वाचा - अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?

पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्लेपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी मध्यरात्री १ वाजता पाकिस्तानच्या ७ शहरांमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. तिन्ही सैन्यांनी मिळून पाकिस्तानवरील या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले आहे. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने ही प्रत्युत्तराची कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ भारतीयांना ठार मारले. 

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपाकिस्तानशेअर बाजारशेअर बाजार