Join us

३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:34 IST

NSDL Stock Price: बाजारात एन्ट्री झाल्यानंतर ३ दिवसांतच कंपनीचे शेअर्स ६० टक्क्यांहून अधिक वाढलेत. पाहा कोणता आहे हा शेअर आणि तुमच्याकडे आहे का?

NSDL Stock Price: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे (NSDL) शेअर्स आज तेजीत आहेत. बाजारात एन्ट्री झाल्यानंतर ३ दिवसांतच NSDL चे शेअर्स ६० टक्क्यांहून अधिक वाढलेत. शुक्रवारी, BSE मध्ये NSDL चे शेअर्स १५ टक्क्यांहून अधिक वाढून १२९९ रुपयांवर पोहोचले. NSDL चे शेअर्स ६ ऑगस्ट २०२५ रोजी BSE वर लिस्ट झाले होते. IPO मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत ८०० रुपये होती. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचा IPO ३० जुलै २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि तो १ ऑगस्टपर्यंत खुला होता.

आयपीओच्या किमतीपेक्षा ६०% पेक्षा अधिक वाढ

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) आयपीओमधील शेअरची किंमत ८०० रुपये होती. ६ ऑगस्ट २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स १० टक्के प्रीमियमसह ८८० रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर, कंपनीचे शेअर्स वाढीसह ९३६ रुपयांवर बंद झाले. म्हणजेच, पहिल्या दिवसाच्या आयपीओच्या किमतीच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स १७ टक्क्यांनी वाढले. गुरुवारी एनएसडीएलचे शेअर्स २० टक्क्यांनी वाढून ११२३.२० रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी बीएसईमध्ये कंपनीचे शेअर्स १५ टक्क्यांहून अधिक वाढून १२९९ रुपयांवर पोहोचले. ८०० रुपयांच्या इश्यू प्राईजच्या तुलनेत ३ दिवसांत कंपनीचे शेअर्स ६० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?

४१ पट झालेला सबस्क्राईब

NSDL च्या आयपीओची एकूण साईज ४०११.६० कोटी रुपयांपर्यंत आहे. एनएसडीएलचा आयपीओ एकूण ४१.०२ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ७.७६ पट सबस्क्रिप्शन मिळालं. त्याच वेळी, कर्मचारी श्रेणीत १५.३९ पट बोली लावण्यात आल्या. एनएसडीएल आयपीओला गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) श्रेणीत ३४.९८ पट सबस्क्राइब मिळाला आहे. त्याच वेळी, पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीला १०३.९७ पट सबस्क्रिप्शन मिळालं.

एनएसडीएल आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बेट्स लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये १८ शेअर्स आहेत. म्हणजेच, किरकोळ गुंतवणूकदारांना १ लॉटसाठी १४,४०० रुपये गुंतवावे लागले. एनएसडीएल आयपीओमध्ये एकूण ५,०१,४५,००१ शेअर्स ऑफर करण्यात आले होते. शेअरची फेस व्हॅल्यू २ रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूकपैसा