IT Stocks : गेल्या काही दिवसांपासून भारतीय आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे पारंपरिक आयटी बिझनेस संपेल, या भीतीने गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला होता. मात्र, जागतिक ब्रोकरेज संस्था 'नोमुरा'च्या मते, बाजार या जोखमीला गरजेपेक्षा जास्त वाढवून सांगत आहे. वास्तविक पाहता, बहुतांश घसरण शेअर्सच्या किमतीत आधीच दिसून आली असून, आता हे शेअर्स अत्यंत आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत.
१२ ते ३९ टक्क्यांच्या सवलतीत शेअर्स उपलब्ध!नोमुराच्या अहवालानुसार, सध्या आयटी कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या गेल्या १२ वर्षांच्या सरासरीपेक्षाही कमी किमतीत ट्रेड करत आहेत. गेल्या ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सध्या हे शेअर्स १२ ते ३९ टक्के डिस्काउंटवर मिळत आहेत.P/E गुणोत्तर : जर कंपन्यांनी एआय मॉडेल यशस्वीपणे स्वीकारले, तर त्यांचे P/E गुणोत्तर २० च्या वर जाऊ शकते. सध्या हे प्रमाण १६ ते २१ च्या दरम्यान आहे, जे ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमी आहे.
'AI' ठरणार संकट नव्हे, तर संधी!आयटी कंपन्या स्वतःला 'AI ऑर्केस्ट्रेटर' म्हणून सिद्ध करू शकल्या, तर त्यांच्या महसुलात आणि नफ्यात मोठी वाढ होऊ शकते. येत्या १२ ते १८ महिन्यांत एआयशी संबंधित अनेक संधी उपलब्ध होतील. युबीएसनेही नमूद केले आहे की, आयटी शेअर्सचा फ्री कॅश फ्लो यील्ड ६ टक्के आहे, जो गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आकर्षक आहे.
कोणत्या शेअर्सवर लक्ष ठेवावे?ब्रोकरेज संस्थांनी गुंतवणूकदारांसाठी काही निवडक शेअर्स सुचवले आहेत, जे आगामी काळात चांगली कामगिरी करू शकतात.
- लार्ज कॅप : इन्फोसिस आणि कॉग्निझंट.
- मिड कॅप : कोफोर्ज.
- स्मॉल कॅप : ई-क्लर्क.
- सध्या इन्फोसिसचा शेअर १,३६६ रुपयांच्या आसपास आहे, जो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक चांगला स्तर मानला जात आहे. या कंपन्या ४-५ टक्के डिव्हिडंड यील्ड (लाभांश) देखील देऊ शकतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना अतिरिक्त आधार मिळेल.
जोखीम काय आहे?तेजीची शक्यता असली तरी, जागतिक अनिश्चितता आणि कंपन्यांच्या नफ्यावरील दबाव ही आव्हाने कायम आहेत. जर महसूल वाढ केवळ २-३ टक्के राहिली, तर P/E १०-१२ पर्यंत खाली येऊ शकतो. मात्र, ७-९ टक्के वाढ झाल्यास आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
वाचा - IT क्षेत्राचे भवितव्य टांगणीला? ८ दिवसांत ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान; गुंतवणूकदारांनी काय करावं?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian IT stocks are heavily discounted due to AI fears, presenting a buying opportunity. Nomura suggests the market overestimates the risk. Select large, mid, and small-cap stocks offer attractive valuations and potential dividend yields, though global uncertainty remains a risk.
Web Summary : एआई के डर से भारतीय आईटी स्टॉक भारी छूट पर हैं, जो खरीदारी का अवसर प्रस्तुत करते हैं। नोमुरा का सुझाव है कि बाजार जोखिम को बढ़ा-चढ़ाकर आंक रहा है। चुनिंदा बड़े, मध्यम और छोटे कैप स्टॉक आकर्षक मूल्यांकन और संभावित लाभांश उपज प्रदान करते हैं, हालांकि वैश्विक अनिश्चितता एक जोखिम बनी हुई है।