Investment Tips : गेल्या दीड वर्षांपासून भारतीय शेअर बाजार एका ठराविक मर्यादेत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. २०२५ मध्ये निफ्टीने १०% आणि सेन्सेक्सने ८% परतावा देऊन गुंतवणूकदारांना दिलासा दिला असला, तरी खऱ्या अर्थाने यंदा 'सोने' झळाळले आहे. आता सर्वांच्या नजरा आगामी 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६' कडे लागल्या असून, हा बजेट शेअर बाजाराची पुढची दिशा ठरवणार आहे.
सोन्या-चांदीचा 'सुवर्ण' काळगुंतवणुकीच्या बाबतीत २०२५ हे वर्ष सोने आणि चांदीचे राहिले. जागतिक अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्याच्या दरात तब्बल ६६% वाढ झाली असून, सोन्याने ४,५०० डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडला आहे. चांदीने तर गुंतवणूकदारांना चकित करत १७१% इतका ऐतिहासिक परतावा दिला आहे. औद्योगिक क्षेत्रातून वाढलेली मागणी चांदीच्या दरवाढीला कारणीभूत ठरली आहे.
'बजेट'पूर्वी निफ्टीमध्ये मोठी तेजीची शक्यताPAC 360 चे चीफ ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट अमित गोयल यांच्या मते, अर्थसंकल्पापूर्वी निफ्टी २८,१०० च्या पातळीवर पोहोचू शकतो. विशेष म्हणजे, ही तेजी परदेशी गुंतवणूकदारांपेक्षा स्थानिक गुंतवणूकदारांच्या जोरावर येईल. जर अर्थसंकल्पात सामान्यांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा झाल्या, तर निफ्टी ३२,००० चा टप्पाही गाठू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
'या' क्षेत्रांवर ठेवा लक्ष२०२६ मध्ये 'कन्झ्युमर सेंट्रिक' क्षेत्रांत मोठी उलाढाल अपेक्षित आहे. वाढते उत्पन्न आणि ग्रामीण भागातील सुधारलेली मागणी यामुळे खालील क्षेत्रांना फायदा होईल.
- कन्झ्युमर ड्युरेबल (घरगुती उपकरणे)
- ऑटोमोबाईल (वाहने)
- रिअल इस्टेट (स्थावर मालमत्ता)
- इलेक्ट्रॉनिक्स
तज्ज्ञांच्या पसंतीचे 'टॉप स्टॉक्स'बाजार विश्लेषकांनी गुंतवणुकीसाठी काही निवडक शेअर्स सुचवले आहेत.ऑटो सेक्टर : टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ऊनो मिंडा.FMCG : हिंदुस्थान युनिलिव्हर, ब्रिटानिया (स्थिर परताव्यासाठी).इन्फ्रा आणि डिफेन्स : एल अँड टी, बीईएल, जेएसडब्ल्यू इन्फ्रा.
वाचा - पॅन-आधार लिंकिंगची मुदत संपली! तुमचे पॅन कार्ड 'बंद' झालेय का? जाणून घ्या आता काय करावे?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Forget gold! Experts predict consumer-centric sectors like auto, real estate, and electronics will yield high returns in 2026. All eyes are on the upcoming budget for market direction. Focus on stocks like Tata Motors, Hindustan Unilever, and L&T for potential gains.
Web Summary : सोने को भूल जाइए! विशेषज्ञों का अनुमान है कि ऑटो, रियल एस्टेट और इलेक्ट्रॉनिक्स जैसे उपभोक्ता-केंद्रित क्षेत्र 2026 में उच्च रिटर्न देंगे। बाजार की दिशा के लिए सभी की निगाहें आगामी बजट पर हैं। संभावित लाभ के लिए टाटा मोटर्स, हिंदुस्तान यूनिलीवर और एलएंडटी जैसे शेयरों पर ध्यान दें।