Natco Pharma Shares : नॅटको फार्माच्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस 'सुपर मंडे' ठरला आहे. कंपनीला वजन कमी करण्यासाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'सेमाग्लूटाइड' इंजेक्शनच्या विक्रीसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. या सकारात्मक बातमीमुळे नॅटको फार्माचे शेअर्स आज सुरुवातीच्या व्यवहारात १२ टक्क्यांहून अधिक वधारले.
वजन कमी करण्याच्या औषधाचे 'मार्केट' काबीज करणार?नॅटको फार्माने शनिवारी (१४ फेब्रुवारी) दिलेल्या माहितीनुसार, 'सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन'ने सेमाग्लूटाइड इंजेक्शनच्या निर्मिती आणि विक्रीला मंजुरी दिली आहे. सेमाग्लूटाइड हे जगभरात वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले औषध आहे. प्रामुख्याने टाइप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे अत्यंत प्रभावी मानले जाते. कंपनी हे इंजेक्शन मार्च २०२६ मध्ये भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच करणार आहे. सध्या जागतिक स्तरावर या औषधाची मागणी प्रचंड असून, भारतात याचे जेनेरिक व्हर्जन आणणे नॅटकोसाठी मोठी संधी मानली जात आहे.
USFDA कडून मोठा दिलासाअमेरिकन औषध प्रशासनाकडून कंपनीला क्लीन चिट मिळाली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये अमेरिकन पथकाने कंपनीच्या चेन्नईतील 'एपीआय' युनिटची तपासणी केली होती. त्यावेळी ७ हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. आता USFDA ने ही चौकशी 'VAI' (वॉलंटरी अॅक्शन इंडिकेटेड) श्रेणीत ठेवली आहे. याचा अर्थ असा की, युनिटमध्ये काही किरकोळ सुधारणांची गरज असली तरी कोणताही गंभीर नियमभंग झालेला नाही. यामुळे कंपनीला अमेरिकन बाजारात औषध निर्यातीसाठी कोणताही अडथळा राहणार नाही.
नफ्यात १४ टक्क्यांची वाढकंपनीने नुकतेच आपले तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-डिसेंबर) निकाल जाहीर केले असून ते अत्यंत उत्साहवर्धक आहेत. मागील वर्षीच्या १३३ कोटींच्या तुलनेत यंदा कंपनीचा नफा १४.३ टक्क्यांनी वाढून १५२ कोटी रुपये झाला आहे. महसुलात ३६ टक्क्यांची भरघोस वाढ झाली असून तो ६४७.३ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचे मार्जिन ८.२ टक्क्यांवरून थेट २४.५ टक्क्यांवर पोहोचले असून ही गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे.
Web Summary : Natco Pharma shares surged as its weight-loss injection secured government approval. USFDA clearance further boosted investor confidence. Q3 profits rose 14.3%, with revenue up 36%, signaling strong growth.
Web Summary : नैटको फार्मा के शेयरों में उछाल, वजन घटाने वाले इंजेक्शन को सरकारी मंजूरी मिली। यूएसएफडीए की मंजूरी से निवेशकों का विश्वास बढ़ा। तीसरी तिमाही में मुनाफा 14.3% बढ़ा, राजस्व में 36% की वृद्धि।