Join us

४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:11 IST

NACL Industries Shares: गुरुवारी बीएसईवर एनएसीएल इंडस्ट्रीजचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर २५२.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या ४ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३१५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

NACL Industries Shares: अ‍ॅग्रोकेमिकल कंपनी एनएसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वी नागार्जुन अ‍ॅग्रोकेम म्हणून ओळखली जात होती) यांच्या शेअर्समध्ये रॉकेट तेजी दिसून आली. गुरुवारी बीएसईवर एनएसीएल इंडस्ट्रीजचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर २५२.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या ४ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३१५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) मुरुगप्पा समूहाच्या कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीला एनसीएल इंडस्ट्रीजमधील नियंत्रक हिस्सा विकत घेण्यास मान्यता दिली आहे.

८२० कोटींना खरेदी करणार

मुरुगप्पा समूहाची कंपनी कोरोमंडल इंटरनॅशनल एनएसीएल इंडस्ट्रीजमधील (NACL Industries) नियंत्रक हिस्सा ८२० कोटी रुपयांना विकत घेत आहे. कराराच्या रचनेनुसार, कोरोमंडल इंटरनॅशनल १०,६८,९६,१४६ इक्विटी शेअर्स खरेदी करेल, जे एनएसीएल इंडस्ट्रीजच्या एकूण पेड-अप इक्विटी भागभांडवलाच्या ५३.१३ टक्के आहे. प्रवर्तक शेअर खरेदी कराराच्या अटींनुसार हे शेअर्स केएलआर प्रॉडक्ट्स लिमिटेड, के लक्ष्मी राजू (प्रवर्तक) आणि ब्राइट टाऊन इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड कडून खरेदी केले जातील. याशिवाय कोरोमंडल इंटरनॅशनल, अॅग्रो केमिकल एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अ‍ॅग्रो लाइफ सायन्स कॉर्पोरेशन दोन सार्वजनिक भागधारकांकडून प्रत्येकी ५,५०० शेअर्स खरेदी करणार आहेत.

Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या

४ महिन्यांत ३१५ टक्क्यांची तेजी

एनएसीएल इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या ४ महिन्यांत ३१५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ३ मार्च २०२५ रोजी एनएसीएल इंडस्ट्रीजचा शेअर ६०.५९ रुपयांवर होता. ३ जुलै २०२५ रोजी कंपनीचा शेअर २५२.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४२ टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये २१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २५२.५० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४८.६० रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा