Moschip Technologies Share: बाजारात विक्री सुरू असली तरी, शुक्रवारी मॉशचिप टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सची मागणी कायम राहिली. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शुक्रवारी, एनएसईवर शेअर १०% वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी २४४.७९ रुपयांवर पोहोचला. हा सलग सहावा ट्रेडिंग दिवस आहे जेव्हा यात तेजी दिसून येत आहे. अशा प्रकारे, आठवड्याच्या आधारावर शेअर ४२% पर्यंत वाढला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत कंपनीचे शेअर्स ६.५% वाढलेत आणि गेल्या सहा महिन्यांत ५६% वाढलेत.
पंतप्रधान मोदींचा फोकस
हैदराबादस्थित सेमीकंडक्टर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ अशा वेळी दिसून येत आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्योगावर लक्ष ठेवून आहेत. अलिकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीकॉन इंडिया २०२५ मध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. या चर्चेमध्ये सेमीकंडक्टर जगातातील प्रमुख व्यक्तींनी भाग घेतला होता.
फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?
काय म्हणाले मोदी?
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. "भारतातील अधिकाऱ्यांचा विश्वास स्पष्ट आहे आणि ते सेमीकंडक्टर इनोव्हेशन आणि मॅन्युफॅक्चरिंगचे जागतिक केंद्र म्हणून भारतावर मोठा विश्वास दाखवत आहेत. मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि कौशल्य विकास, नाविन्यपूर्णतेवर भर देणं यासह या क्षेत्रात भारताच्या निरंतर सुधारणांच्या प्रवासाबद्दलही मी चर्चा केली. २ ते ४ सप्टेंबर दरम्यान राजधानीत होणाऱ्या 'सेमीकॉन इंडिया २०२५'च्या पहिल्या दोन दिवसांत काही महत्त्वाचे करारही झाले," असं मोदी म्हणाले.
भारत सेमीकंडक्टर मिशनच्या दुसऱ्या टप्प्यावर (ISM २.०) काम करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ISM च्या पहिल्या टप्प्यात आधीच १० प्रकल्पांमध्ये १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यात यश मिळालं आहे.
कंपनीचं शेअरहोल्डिंग पॅटर्न
जून तिमाहीत कंपनीच्या प्रवर्तकांकडे मोस्चिपमध्ये ४४.२८% हिस्सा होता, तर २ लाख रुपयांपर्यंत अधिकृत शेअर भांडवल असलेल्या २.५ लाखांहून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांकडे ३७.१% हिस्सा होता. बीएसई फाइलिंगनुसार, कंपनीकडे कोणतंही संस्थात्मक किंवा म्युच्युअल फंड होल्डिंग नाहीत.
(टीप- यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)