Join us

मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा मुकुट धोक्यात; टाटा समूहाची 'ही' कंपनी देताहे तगडे आव्हान ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:35 IST

Reliance Vs TCS: रिलायन्सचे मार्केट कॅप 16.55 लाख कोटी रुपयांवर आले असून, टाटा समूहाची कंपनी 15.12 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपवर पोहोचली आहे.

Reliance Stock Price: देशासह आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींची सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा मुकुट धोक्यात आलाय. भारतातील सर्वात मोठी कंपनी असण्यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज ही सर्वात मौल्यवान कंपनी आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांत रिलायन्सच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीनंतर शेअर बाजारातील सर्वात मौल्यवान कंपनीचा मान गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. 8 जुलै 2024 रोजी ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर कंपनीचा शेअर 24 टक्क्यांनी घसरला आहे.

रिलायन्सचे मार्केट कॅप 16.55 लाख कोटींवर आलेरिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठ्या घसरणीनंतर कंपनीचे मार्केट कॅप 16.55 लाख कोटी रुपयांवर आले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी, म्हणजेच 28 जून 2024 रोजी कंपनीचे मार्केट कॅप 21 लाख कोटी रुपयांच्या पुढे होते. 8 जुलै रोजी रिलायन्सच्या शेअर्सने 1608 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. पण 24 डिसेंबर 2024 रोजी, या पातळीपासून 24 टक्क्यांनी घसरून शेअर 1222 रुपयांवर बंद झाला.

टीसीएसकडून रिलायन्सला धोकारिलायन्सचे मार्केट कॅप 16.55 लाख कोटी रुपयांवर आले असून, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टाटा समूहाच्या TCS आणि रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये फक्त 1.43 लाख कोटी रुपयांचा फरक उरला आहे. टाटा कन्सल्टन्सीचे मार्केट कॅप 15.12 लाख कोटी रुपये आहे. तर बाजार भांडवलाच्या बाबतीत HDFC बँक तिसऱ्या स्थानावर असून, त्याचे मूल्य 24 डिसेंबर 2024 च्या बंद किंमतीनुसार 13.74 लाख कोटी रुपये आहे. रिलायन्सच्या शेअर्समधील घसरण चालू राहिली, तर TCS रिलायन्स इंडस्ट्रीजला मागे सोडू शकते. अलीकडच्या काळात आयटी शेअर्समध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे टीसीएस रिलायन्सला मागे सोडण्याची शक्यता वाढत आहे.

2025 मध्ये रिलायन्स जिओची लिस्टिंगनवीन वर्ष 2025 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. रिलायन्स ग्रुप 2025 मध्ये आपली टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा IPO लॉन्च करू शकते,अशी अटकळ आहे. 

CLSA-Jefferies रिलायन्सवर बुलीशजेफरीजने आपल्या रिसर्च नोटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स विकत घेण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की, स्टॉक 1700 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. CLSA ने आपल्या अहवालात 2025 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत Reliance Jio IPO लाँच होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच, रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक 2186 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असेही म्हटले आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :मुकेश अंबानीशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकटाटारिलायन्स