Join us

मुकेश अंबानी यांच्या ३८ रुपयांच्या शेअरवर गुतवणूकदारांच्या उड्या; नीचांकी पातळीवरुन मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:52 IST

Mukesh Ambani : आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली.

Mukesh Ambani : ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. दिग्गज कंपन्यांचे शेअर्सही सपाटून आपटले आहेत. तर अनेक छोट्या स्टॉक्ट्सने मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अशीच एक कंपनी डेन नेटवर्क आहे. या कंपनीत उद्योगपती मुकेश अंबानी यांची गुंतवणूक आहे. डेन नेटवर्कच्या शेअरची किंमत ४० रुपयांपेक्षाही कमी आहे. मंगळवारी या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी या शेअर ५२ आठवड्यांच्या निच्चांकी पातळीवर गेला होता.

डेन नेटवर्क्स लिमिटेड शेअरची कामगिरी कशी आहे?मंगळवारी ट्रेडिंग दरम्यान, डेन नेटवर्क्स लिमिटेडचे ​​शेअर्स ६ टक्क्यांनी वाढून ३८.६९ रुपयांवर पोहोचले. या काळात शेअर ३५.५१ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये हा शेअर ६५.०३ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. हा त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.

काय करते डेन नेटवर्क्स लिमिटेड?डेन नेटवर्क्स लिमिटेड कंपनी केबल टीव्ही सेवा पुरवठादार आहे. कंपनीच्या प्रवर्तकाकडे ७४.९० टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, सार्वजनिक भागीदारी २५ टक्के आहे. त्याच्या प्रवर्तकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज लिमिटेड आणि इतर अनेक रिलायन्स कंपन्या समाविष्ट आहेत. यामध्ये जिओ फ्युचरिस्टिक डिजिटल होल्डिंग्ज, नेटवर्क 18 मीडिया आणि इतरांचा सहभाग आहे. रिलायन्स व्हेंचर्स लिमिटेड आणि जिओ टेलिव्हिजन डिस्ट्रिब्युशन होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेही स्टेक आहेत.

कंपनीची तिमाही कामगिरीडेन नेटवर्क्स लिमिटेडने अलीकडेच ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक १४.६% नी कमी होऊन ४०.३ कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत डेन नेटवर्क्सचा नफा ४७.२ कोटी होता. तिमाहीत एबिटा मार्जिन १०.६% राहिला, जो मागील वर्षीच्या कालावधीत १४.९% होता.

बाजारात मोठी रिकव्हरीआठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स सुमारे ८२४ अंकांनी कोसळला होता. मात्र, मंगळवारी त्याची भरपाई पाहिला मिळाली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स जवळपास ९०० अंकांनी वाढला. ट्रेडिंग दरम्यान स्टॉकने ७६००० चा टप्पा ओलांडला होता. त्याचप्रमाणे निफ्टीमध्येही जोरदार वाढ झाली.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सशेअर बाजारशेअर बाजार