Join us

Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:31 IST

Diwali Muhurat Trading 2025 Date and Time Details: दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग प्रथा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार खुला होईल.

Diwali Muhurat Trading 2025 Date and Time: दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग प्रथा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार खुला होईल. यावेळी मुहूर्त ट्रेडिंग २१ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. परंतु यावेळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी असलेल्या वेळेत मात्र बदल करण्यात आलाय. दुपारी १.४५ वाजता कामकाजासाठी बाजार उघडेल आणि २.४५ वाजता बंद होईल. ट्रेडिंगमध्ये बदल करण्याची अंतिम वेळ १४:५५ वाजेपर्यंत असेल. मुहूर्त ट्रेडिंग हे दिवाळीच्या सणाचं आणि नवीन संवत २०८२ वर्षाच्या सुरुवातीचं प्रतीक आहे.

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी असते. पण, दरवर्षी या दिवशी एक तासासाठी बाजार उघडतो. याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. या वर्षी हे २१ ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. या दिवशी दुपारी १.४५ वाजता बाजार उघडेल आणि २.४५ वाजता बंद होईल. साधारणपणे, यापूर्वी याचं आयोजन संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ वाजेपर्यंत व्हायचं.

शेअर बाजारात आज नफावसुली: दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक; आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण

ट्रेडिंग रणनीतीचा महत्त्वाचा भाग

मुहूर्त ट्रेडिंगला खूप खास मानलं जातं. लोकांचा असा विश्वास आहे की यामुळे सौभाग्य आणि समृद्धी येते. या वेळेत ट्रेडिंग सुरू केल्यानं वर्षभर सकारात्मक वातावरण राहतं. अनेक व्यापारी याला त्यांच्या ट्रेडिंग रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग मानतात.

गेल्या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग १ नोव्हेंबर रोजी झालं होतं. त्या दिवशी बाजार मजबूत स्थितीत बंद झाला होता. सेन्सेक्स ३३५.०६ अंकांनी वाढला होता. ही ०.४२ टक्क्यांची वाढ होती. तो ७९,७२४.१२ अंकांवर बंद झाला होता. निफ्टी ९९ अंकांनी वाढला होता. ही ०.४१ टक्क्यांची वाढ होती. ५० शेअर्सचा हा इंडेक्स २४,३०४.३० वर बंद झाला होता. जवळपास २९०४ शेअर्समध्ये वाढ झाली होती. ५४० शेअर्समध्ये घट झाली होती, तर ७२ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

मुहूर्त ट्रेडिंगमागील मान्यता काय आहे?

आता जाणून घेऊया की मुहूर्त ट्रेडिंग का खास आहे. वास्तविक, हिंदू धर्मात दिवाळीचा दिवस खूप शुभ मानला जातो. हा सण समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे. मुहूर्त ट्रेडिंग देखील याच मान्यतेवर आधारित आहे. असं मानले जाते की या दिवशी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास वर्षभर लाभ होतो.

मुहूर्त ट्रेडिंग एक प्रकारे शगुन मानलं जातं. लोक या दिवशी काही शेअर्स खरेदी करतात. यामुळे त्यांच्या गुंतवणुकीत वाढ होईल, असा त्यांचा विश्वास असतो. अनेक लोक या दिवशी नवीन खातीदेखील उघडतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Muhurat Trading on Diwali: Market Timing Changed for 2025

Web Summary : Diwali's Muhurat Trading in 2025 will occur on October 21st. The market opens at 1:45 PM and closes at 2:45 PM. This auspicious trading is believed to bring prosperity throughout the year, making it a key strategy for many traders.
टॅग्स :दिवाळी २०२५शेअर बाजारभारतीय उत्सव-सणस्टॉक मार्केट