Join us

एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:24 IST

MRF Q1 Results: या कंपनीचे शेअर्स आज फोकसमध्ये होते. कामकाजादरम्यान यात मोठी घसरण झाली.

MRF Q1 Results: टायर उत्पादक एमआरएफ लिमिटेडचे शेअर्स सतत्यानं फोकसमध्ये आहेत. मंगळवारी व्यवहारादरम्यान कंपनीचे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे ४,०१८.७ रुपयांनी घसरुन १३८००६ रुपयांवर पोहोचले. त्यांची मागील बंद किंमत १४२०२४.७० रुपये होती. दरम्यान, कंपनीचे शेअर्स आजच्या नीचांकी पातळीपासून सावरण्याचा प्रयत्न करत होते.

जून तिमाहीत कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे आणि मार्जिन देखील कमी झालं आहे. या तिमाहीतील नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत १४% कमी होऊन ₹५६३ कोटींवरून ₹४८४ कोटींवर पोहोचला आहे. इतर उत्पन्नात वाढ झाली असली तरी, निव्वळ नफ्यात घट झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या ₹८३ कोटींवरून ₹१२५ कोटींवर पोहोचली आहे. तिमाही महसूल वार्षिक आधारावरुन ७% वाढून ₹७,५६० कोटींवर पोहोचला आहे, जो पूर्वीच्या ₹७,०७८ कोटी होता.

ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?

अधिक डिटेल्स काय?

या तिमाहीत व्याज, कर, डेप्रिसिएशन आणि कर्जमाफीपूर्वीचे उत्पन्न (EBITDA) गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ९% कमी होऊन ₹१,०३४ कोटी झालं आहे, तर नफा २०० बेसिस पॉइंट्सपेक्षा जास्त घसरून गेल्या वर्षीच्या १६.१% वरून १३.७% झाला आहे. जून तिमाही हा भारताच्या टायर उद्योगासाठी सामान्यतः कमकुवत तिमाही मानला जातो. या तिमाहीत MRF चा एकूण नफा गेल्या वर्षीच्या ३७.३% वरून ३०० बेसिस पॉइंट्सने घसरून ३४.३% झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या मालाच्या किमती ६% वाढून ₹४,५९७ कोटी झाल्यानं हे घडलंय.

शेअरची स्थिती काय?

एमआरएफने यावेळी त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी कोणताही लाभांश जाहीर केलेला नाही. एमआरएफचे शेअर्स दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरत आहेत आणि ते ₹१,४१,५५० वर व्यवहार करत होते. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये ५% घट झाली आहे, परंतु २०२५ पर्यंत तो १०% वाढला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा