LG Electronics IPO Listing: एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. आज बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सचं जबरदस्त लिस्टिंग झालं. बीएसईवर, शेअर्सची किंमत १,७१५ रुपये होती, ज्याचा प्रीमियम अंदाजे ५१% होता, म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रति शेअर ५७५ रुपये नफा झाता. एनएसईवर, कंपनीचे शेअर्स १,७१०.१० रुपयांवर होते. ज्याचा प्रीमियम अंदाजे ५१% होता. याचा अर्थ पहिल्याच दिवशी प्रति शेअर ५७० रुपये नफा झाला. कंपनीनं त्यांच्या आयपीओसाठी प्राईज बँड १,०८० ते १,१४० रुपये प्रति शेअर असा निश्चित केला होता.
जबरदस्त झालेला सबस्क्राईब
या IPO ला बोलीच्या अंतिम दिवसापर्यंत ५४.०२ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. पात्र संस्थागत खरेदीदारांच्या मोठ्या सहभागामुळे हे शक्य झाले. एनएसईच्या आकडेवारीनुसार, ११,६०७ कोटी रुपयांच्या या IPO ला ३,८५,३३,२६,६७२ शेअर्ससाठी बोली मिळाली झाली, तर प्रस्तावित शेअर्सची संख्या ७,१३,३४,३२० होती. पात्र संस्थागत खरेदीदारांच्या (QIB) कोट्यासाठी १६६.५१ पट सबस्क्राइब करण्यात आलं, तर गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी (NII) २२.४४ पट सबस्क्रिप्शन मिळाले. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीतून याला ३.५४ पट सबस्क्राइब करण्यात आले. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडनं अँकर गुंतवणूकदारांकडून ३,४७५ कोटी रुपये उभे केले होते.
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
IPO बद्दल माहिती
हा IPO पूर्णपणे दक्षिण कोरियाई मूळ कंपनीद्वारे १०.१८ कोटी शेअर्सची विक्री ऑफर आहे, जो अंदाजे १५ टक्के भागभांडवलाच्या बरोबरीची आहे. हा IPO पूर्णपणे OFS असल्यामुळे, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाला IPO मधून कोणतीही कमाई मिळणार नाही. जमा झालेला निधी दक्षिण कोरियाई मूळ कंपनीला जाईल. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेडच्या लिस्टिंगनंतर, भारतीय शेअर बाजारात प्रवेश करणारी ही दुसरी दक्षिण कोरियाई कंपनी आहे.
कंपनीचा व्यवसाय
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रमुख घरगुती उपकरणं आणि कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीचं उत्पादन भारत आणि परदेशातील ‘B2C’ आणि ‘B2B’ अशा दोन्ही ग्राहकांना विकले जातात. ही कंपनी आपल्या सर्व उत्पादनांसाठी स्थापना, दुरुस्ती आणि देखभाल सेवा देखील प्रदान करते. कंपनी वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एलईडी टीव्ही पॅनेल, इन्व्हर्टर एअर कंडिशनर आणि मायक्रोवेव्हसह अनेक उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री करते. तिची उत्पादन युनिट्स नोएडा आणि पुण्यात आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : LG Electronics IPO listed strongly, offering investors ₹575 profit per share. Subscribed 54 times, driven by institutional buyers. IPO price was ₹1,080-₹1,140. Company manufactures appliances and electronics, with units in Noida and Pune.
Web Summary : एलजी इलेक्ट्रॉनिक्स आईपीओ की मजबूत लिस्टिंग, निवेशकों को प्रति शेयर ₹575 का लाभ। संस्थागत खरीदारों के कारण 54 गुना सब्सक्राइब किया गया। आईपीओ मूल्य ₹1,080-₹1,140 था। कंपनी नोएडा और पुणे में इकाइयों के साथ उपकरण और इलेक्ट्रॉनिक्स बनाती है।