Join us

गुंतवणूकीची मोठी संधी; 'या' तारखेला येणार LG चा ११५०० कोटी रुपयांचा IPO...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:43 IST

LG Electronics India IPO : कंपनी आपले १०.१८ कोटी शेअर्स विक्रीसाठी आणणार आहे.

LG Electronics India Limited लवकरच शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. कंपनीचा IPO ७ ऑक्टोबरला सब्स्क्रिप्शनसाठी खुले होईल आणि ९ ऑक्टोबरला बंद होईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत असेल. यामध्ये पॅरेंट कंपनी LG Electronics Inc. आपले १०.१८ कोटी शेअर्स विक्रीसाठी आणणार आहे. त्यामुळे या शेअर विक्रीतून भारतीय कंपनीला थेट कोणतीही रक्कम मिळणार नाही.

11,500 कोटींच्या निधी उभारणीची योजना

मीडिया रिपोर्ट्सनुसार, LG Electronics India आपली पॅरेंट कंपनीतील १५ टक्के हिस्सेदारी विकून सुमारे ११,५०० कोटी रुपये (१.३ अब्ज डॉलर) उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे मूल्यमापन (Valuation) सध्या सुमारे ९ अब्ज डॉलर इतके करण्यात आले आहे. हे मूल्यांकन पूर्वीच्या १५ अब्ज डॉलरच्या अंदाजापेक्षा कमी आहे.

मोठ्या IPO शी स्पर्धा

या वर्षातील दोन सर्वात मोठे IPO, Tata Capital आणि LG Electronics India, दोन दिवसांसाठी एकत्र खुले राहणार आहेत. Tata Capital चा १५,००० कोटी रुपयांहून अधिकचा IPO ६ ऑक्टोबरला खुला होणार आहे. LG Electronics India च्या IPO साठी प्राइस बँड अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : LG Electronics India IPO: ₹11,500 Crore Opportunity Coming Soon

Web Summary : LG Electronics India's ₹11,500 crore IPO opens October 7th. The OFS involves LG Electronics Inc. selling shares; funds won't directly benefit the Indian company. The IPO competes with Tata Capital's offering. Price band is awaited. Consult experts before investing.
टॅग्स :एलजीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक